पोलीस ठाण्याच्या आवारातून चोरटा पळाला
By Admin | Updated: July 5, 2015 02:45 IST2015-07-05T02:45:36+5:302015-07-05T02:45:36+5:30
मेडिकलमध्ये रुग्णांच्या नातेवाईकांनी रंगेहात पकडलेला एक चोरटा पोलीस ठाण्याच्या आवारातूून पळून गेला.

पोलीस ठाण्याच्या आवारातून चोरटा पळाला
नागपूर : मेडिकलमध्ये रुग्णांच्या नातेवाईकांनी रंगेहात पकडलेला एक चोरटा पोलीस ठाण्याच्या आवारातूून पळून गेला. शुक्रवारी मध्यरात्री ही घटना घडली. या प्रकरणाची पोलिसांकडे नोंद नाही, हे विशेष !
रुग्णांच्या नातेवाईकांच्या बाजूला झोपायचे आणि मध्यरात्री त्यांच्या रकमेवर, मौल्यवान साहित्यावर हात साफ करायचा, अशी कार्यपध्दत असलेला चोरटा शुक्रवारी मध्यरात्री असाच प्रयत्न करू लागला. मात्र, बाजूच्या मंडळीच्या लक्षात हा प्रकार आला. त्यामुळे त्यांनी त्याला रंगेहात पकडले आणि त्याची बेदम धुलाई केली. त्यानंतर मेडिकलमधील सिक्युरिटी गार्डने त्याला ताब्यात घेतले. त्याला अजनी ठाण्यात नेण्यात आले. ठाण्यात अन्य तक्रारदारांची गर्दी असल्यामुळे त्याला बाहेरच बसविण्यात आले. लघुशंकेचा बहाणा करीत हा आरोपी ठाण्याच्या बाहेरून पळून गेला. (प्रतिनिधी)