शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

रितिका मालूंना अटक करण्यासाठी पोलिसांची सत्र न्यायालयात धाव

By राकेश पांडुरंग घानोडे | Updated: July 15, 2024 18:22 IST

मालूंना नोटीस : येत्या गुरुवारपर्यंत उत्तर देण्याचे निर्देश

राकेश घानोडेनागपूर : मद्यधुंद अवस्थेत मर्सिडिज कार चालवून दोन तरुणांना चिरडल्याचा आरोप असलेल्या रितिका उर्फ रितू दिनेश मालू (३९) यांना अटक करण्यासाठी तहसील पोलिसांनी सत्र न्यायालयात धाव घेतली आहे. या न्यायालयाने सोमवारी मालू यांना नोटीस बजावून यावर येत्या गुरुवारपर्यंत लेखी उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले.

प्रकरणावर न्यायाधीश एस. यू. हाके यांच्यासमक्ष सुनावणी झाली. पोलिसांच्या वतीने ॲड. रश्मी खापर्डे यांनी बाजू मांडली. मालू यांनी आतापर्यंत प्रकरणाच्या तपासाला कोणतीही मदत केली नाही. उलट पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. अपघात झाल्यानंतर त्या सहा तास फरार होत्या. दरम्यान, त्यांनी खासगी रुग्णालयात उपचार घेतले व महत्वाचे पुरावे नष्ट केले. त्यामुळे त्यांना अटक करणे आवश्यक आहे. त्याशिवाय, प्रकरणाच्या तपासात प्रगती होऊ शकत नाही, असा दावा ॲड. खापर्डे यांनी केला. यापूर्वी पोलिसांनी प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी न्यायालयात अर्ज दाखल करून मालू यांना अटक करण्याची परवानगी मागितली होती. गेल्या ९ जुलै रोजी तो अर्ज तांत्रिक कारणांमुळे नामंजूर केला गेला. परिणामी, पोलिसांनी सत्र न्यायालयात रिव्हिजन अर्ज दाखल केला आहे.

टॅग्स :AccidentअपघातCrime Newsगुन्हेगारीnagpurनागपूर