शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

आश्चर्य! पोलिसांनी दुसऱ्याच महिलेच्या शवविच्छेदनावरून नोंदविला खुनाचा गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2022 17:14 IST

पती, सासू, सासऱ्याला मनस्ताप : सत्र न्यायालयाने निर्दोष सोडले

नागपूर : पोलिस किती महाभयंकर चूक करू शकतात, याचा आश्चर्यकारक नमुना नुकताच पुढे आला. हुडकेश्वर पोलिसांनी एका प्रकरणात दुसऱ्याच महिलेच्या शवविच्छेदन अहवालावरून पती, सासू व सासऱ्याविरुद्ध विवाहितेच्या खुनाचा गुन्हा दाखल केला. त्यामुळे पती, सासू व सासऱ्याला विनाकारण शारीरिक-मानसिक त्रास सहन करावा लागला. सामाजिक बदनामीला तोंड द्यावे लागले. परिणामी, प्रकरणाचा खटला प्रलंबित असतानाच सासऱ्याने जगाचा निरोप घेतला.

भोजराज वाकोडीकर (४०) असे पतीचे व रेखा (६५) असे सासूचे नाव असून ते इंद्रनगर, नवीन नरसाळा रोड येथील रहिवासी आहेत. सासऱ्याचे नाव पैकूजी (७०) होते. पोलिसांच्या चुकीमुळे या खटल्याचा मुख्य आधारच पोकळ ठरल्याने सत्र न्यायालयाचे न्या. एस. आर. अग्रवाल यांनी हयात असलेल्या पती व सासूला निर्दोष सोडले. सासऱ्याचे नाव मृत्यूनंतर खटल्यातून वगळण्यात आले होते.

पोलिसांनी सुरुवातीला गुन्हा दाखल केला नव्हता. त्यानंतर या प्रकरणाशी काहीही संबंध नसलेल्या कुसूम पाटील या महिलेच्या शवविच्छेदन अहवालाच्या आधारावर पती, सासू व सासऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींचे वकील ॲड. चंद्रशेखर जलतारे यांनी ही चूक न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. तसेच, आरोपींविरुद्ध इतर कोणतेही ठोस पुरावे नसल्याचे सांगितले व आरोपी निर्दोष सुटले.

प्रकरण काय?

विवाहितेचे नाव प्रीती होते. भोजराज व प्रीतीचे १० डिसेंबर २००९ मध्ये लग्न झाले होते. त्यांना एक मुलगा आहे. प्रीतीच्या वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर विम्याचे २ लाख ५० हजार रुपये मिळाले होते. भोजराजने प्रीतीवर दबाव वाढवून त्यातील एक लाख रुपये घेतले होते. या रकमेवरून प्रीतीला नेहमीच शारीरिक-मानसिक त्रास दिला जात होता. याशिवाय प्रीतीला भोजराजचे विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय होता. त्यावरूनही भांडणे होत होती. परिणामी, आरोपींनी ११ सप्टेंबर २०१७ रोजी प्रीतीचा नाकतोंड दाबून खून केला, अशी तक्रार प्रीतीच्या भावाने पोलिस ठाण्यात नोंदविली होती.

टॅग्स :Courtन्यायालयPoliceपोलिसnagpurनागपूर