शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात ‘नायलॉन’ मांजा विक्रेत्यांवर पोलिसांचा छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 21:55 IST

राष्ट्रीय हरित लवादाच्या निर्देशानंतरदेखील ‘नायलॉन’ मांजाची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांना पोलिसांनी दणका दिला आहे. शुक्रवारी व शनिवारी पोलिसांनी शहरातील विविध भागांत छापेमारी करत लाखो रुपयांचा अवैध मांजा जप्त केला. शहरातील विविध बाजारांमध्ये ‘नायलॉन’ मांजाची छुप्या पद्धतीने विक्री सुरू असल्याची बाब ‘लोकमत’ने उघडकीस आणली होती हे विशेष.

ठळक मुद्देदीड लाखांहून अधिक किमतीचा मांजा जप्त‘नायलॉन’ मांजा वापराल तर तुरुंगात जालप्रभाव ‘लोकमत’चा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रीय हरित लवादाच्या निर्देशानंतरदेखील ‘नायलॉन’ मांजाची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांना पोलिसांनी दणका दिला आहे. शुक्रवारी व शनिवारी पोलिसांनी शहरातील विविध भागांत छापेमारी करत लाखो रुपयांचा अवैध मांजा जप्त केला. शहरातील विविध बाजारांमध्ये ‘नायलॉन’ मांजाची छुप्या पद्धतीने विक्री सुरू असल्याची बाब ‘लोकमत’ने उघडकीस आणली होती हे विशेष.शहरात मोठ्या प्रमाणावर ‘नायलॉन’ मांजा विकण्यात येत असून खरेदी करणाऱ्यांमध्ये अगदी शाळकरी व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचादेखील समावेश आहे. राष्ट्रीय हरित लवादाने स्पष्ट शब्दांत निर्देश दिल्यानंतरदेखील या जीवघेण्या मांजाचा उपयोग सुरू आहे. ‘लोकमत’ने यासंदर्भात वृत्त प्रकाशित केल्यानंतर कोतवाली पोलिसांनी जुनी शुक्रवारी परिसरात छापा टाकला. यावेळी नितीन जैस या विक्रेत्याकडे मोठ्या प्रमाणात ‘नायलॉन’ मांजा आढळून आला. त्याच्याकडून १ लाख ४४ हजार रुपये किमतीचा ‘नायलॉन’ मांजा तसेच पतंगी व चक्रीदेखील जप्त करण्यात आल्या. त्याच्यावर ‘एव्हायर्नमेन्ट प्रिव्हेन्शन अ‍ॅक्ट’नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. शनिवारीदेखील पोलिसांनी महाल, सक्करदरा, जुनी शुक्रवारी येथील काही दुकानांची तपासणी केली.पोलिसांचा राहणार ‘वॉच’मकरसंक्रांतीच्या दिवशीदेखील पोलिसांची ‘नायलॉन’ मांजा विकणारे तसेच वापरणाऱ्यांवर करडी नजर राहणार आहे. कुठलीही व्यक्ती हा मांजा विकताना किंवा याचा उपयोग करताना आढळून आली तर त्याच्यावर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.‘नायलॉन’ मांजा वापरल्यास गुन्हा‘बॉम्बे पोलीस अ‍ॅक्ट’मध्ये पतंगांबाबत कलम ११३, ११७ अंतर्गत तरतुदी स्पष्ट केल्या आहेत. जर पतंग उडविण्यामुळे कोणाला शारीरिक इजा किंवा नुकसान होणार असेल तर कलम ११३ नुसार तो गुन्हा ठरतो व त्या व्यक्तीला कलम ११७ नुसार १२०० रुपयांचा दंड होऊ शकतो. त्याशिवाय यात स्पष्ट करण्यात आले आहे की जर अशा प्रकारे कुणी पतंग उडविताना दिसला तर पोलिसांनी त्या व्यक्तीला तिथेच थांबविले पाहिजे. जर यामुळे कोणी मरण पावला तर भा.दं.वि.च्या कलम ३०४ नुसार सदोष मनुष्यवधाचा गुन्हा होतो. त्यामुळे ‘नायलॉन’ मांजा वापरणाऱ्यांवरदेखील पोलीस गुन्ह्याची नोंद करु शकतात.

टॅग्स :Policeपोलिसnagpurनागपूर