तडीपार डोंगाला पोलिसांनी टाकले तुरुंगात;
By दयानंद पाईकराव | Updated: November 4, 2023 14:14 IST2023-11-04T14:13:54+5:302023-11-04T14:14:05+5:30
आरोपी डोंगाला पोलिस उपायुक्त झोन एक यांनी २६ फेब्रुवारी २०२२ पासून दोन वर्षांसाठी तडीपार केले होते.

तडीपार डोंगाला पोलिसांनी टाकले तुरुंगात;
नागपूर : नागपूर शहर आणि ग्रामीणच्या हद्दीतून तडीपार असलेला एक कुख्यात आरोपी शहरात फिरताना दिसल्यामुळे गुन्हे शाखेच्या युनिट एकने त्यास ताब्यात घेऊन प्रतापनगर पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. सम्यक उर्फ डोंगा संतोष दाभने (वय २३, रा. संत तुकडोजीनगर, प्रतापनगर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
आरोपी डोंगाला पोलिस उपायुक्त झोन एक यांनी २६ फेब्रुवारी २०२२ पासून दोन वर्षांसाठी तडीपार केले होते. तरी देखिल आरोपी डोंगा विना परवाना प्रतापनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत फिरत होता. गुन्हे शाखेच्या युनिट एकचे हवालदार नरेश तुमडाम हे ३ नोव्हेंबरला सहकाऱ्यांसह गस्त घालत असताना त्यांना सुभाषनगर येथील दुकानासमोर आरोपी डोंगा आढळला. लगेच त्यास अटक करून प्रतापनगर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.