शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

उपराजधानीतील पन्नाशी ओलांडलेले पोलीस कार्यालयातच काम करणार; पोलीस आयुक्तांचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2020 11:10 IST

५० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना बाहेर फिल्डवर न पाठवता त्यांच्याकडून कार्यालयीन कामकाजच काढून घ्या, असे आदेश पोलिस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी शहर पोलीस दलाला दिले आहेत.

नरेश डोंगरेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहर पोलीस दलातील ३ पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाने विळखा घातल्याचे स्पष्ट होताच हादरलेल्या पोलीस प्रशासनाने खबरदारीच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर, ५० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना बाहेर फिल्डवर न पाठवता त्यांच्याकडून कार्यालयीन कामकाजच काढून घ्या, असे आदेश पोलिस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी शहर पोलीस दलाला दिले आहेत.त्यामुळे सुमारे एक हजार पोलीस कर्मचारी बंदोबस्त अथवा इतर बाहेर ठिकाणचे कर्तव्य बजावणार नाहीत. तर ते पोलीस ठाणे अथवा अधिकाऱ्यांच्या कार्यालयात राहूनच कर्तव्यपूर्ती करणार आहेत. कोरोनाचा संसर्ग अंधाधुंद गोळीबारासारखा धोकादायक आहे. कुणाला कशा पद्धतीने प्रादुर्भाव होईल याचा कसलीही नेम नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव झालेल्या ५० वर्षापेक्षा जास्त वयाच्या व्यक्तीला धोका जास्त असतो. त्यात ज्यांना उच्च रक्तदाब. मधुमेहासारखी व्याधी आहे, अशांसाठी कोरोना फारच धोकादायक असतो, हे आतापर्यंत स्पष्ट झाले आहे. नागपूर पोलीस दलातील तीन पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोनाने विळखा घातल्याचे शनिवारी उघडकीस आले आणि अवघ्या पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली. त्यामुळे खबरदारी नव्हे तर अतिखबरदारीचे अनेक उपाय हाती घेण्यात आले आहेत. शहरातील जे परिसर (रेड झोन) सील करण्यात आले, अशा ठिकाणच्या पोलिसांना सुरक्षा किट देण्यात आल्या. त्याचप्रमाणे अन्य सुविधा उपलब्ध करून देऊन त्यांना सावधगिरीच्या सर्व उपाययोजना करण्याचे सांगण्यात आले आहे. याशिवाय शहर पोलीस दलात असलेल्या ५० वर्षे वयापेक्षा जास्त वय असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला फिल्डवर पाठवायचे नाही. त्यांना कोणत्याही बंदोबस्ताची ड्यूटी देऊ नका, पोलिस ठाण्यात अथवा कार्यालयातच बसवून त्यांच्याकडून काम करून घ्या, असे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे शहर पोलिस दलातील सुमारे एक हजार पोलिस कर्मचारी ज्यांचे वय ५० पेक्षा जास्त आहे आणि ज्यांना रक्तदाब, मधुमेह आणि दुसरी कोणती व्याधी आहे, अशा पोलीस कर्मचाऱ्यांना फक्त आता कार्यालयीन कामकाजच देण्यात आले आहे.

लष्करी दलाची गरज नाहीसरकारने मागणी केल्यानुसार महाराष्ट्राला केंद्राकडून लष्करी जवानांच्या १० कंपन्या मिळाल्या आहेत. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ते जाहीर केले. या पार्श्वभूमीवर, पोलीस आयुक्त डॉ. उपाध्याय यांच्याकडे विचारणा केली असता, नागपुरात पोलिसांचे पुरेसे संख्याबळ असल्यामुळे येथे लष्करी दलाच्या कंपनीची फारशी गरज नसल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPoliceपोलिस