पोलिसांनी लावला चोरट्यांच्या टोळीचा छडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:07 IST2021-03-23T04:07:55+5:302021-03-23T04:07:55+5:30

तिघांना अटक : दुचाक्यासह सव्वालाखांचा मुद्देमाल जप्त लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : पोलिसांनी एका घरफोडीच्या गुन्ह्याचा तपास करताना चोरट्यांच्या ...

Police nab a gang of thieves | पोलिसांनी लावला चोरट्यांच्या टोळीचा छडा

पोलिसांनी लावला चोरट्यांच्या टोळीचा छडा

तिघांना अटक : दुचाक्यासह सव्वालाखांचा मुद्देमाल जप्त

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : पोलिसांनी एका घरफोडीच्या गुन्ह्याचा तपास करताना चोरट्यांच्या टोळीचा छडा लावला. टोळीकडून चोरीच्या तीन दुचाक्या आणि एक लाख ३० हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सोमवार पेठ रघुजी नगरात राहणाऱ्या तबस्सुम शेख उर्फ अशपाक शेख यांच्या घरातून चोरट्यांनी रोख ३० हजार, चांदीचे दागिने आणि मोबाइल असा एकून ६० हजार रुपयांचा मुद्देमाल १६ मार्चला चोरून नेला होता. हुडकेश्वर पोलिसांनी या घरफोडीचा तपास करताना, आरोपी साहिल उर्फ पप्पू राजेश उके, करण दीपक खेरकर, तसेच शुभम उर्फ काल्या संजय कारेमोरे या रामबागेत राहणाऱ्या तीन आरोपींना २० मार्चला अटक केली. त्यांच्या चौकशीतून या तिघांनी घरफोडीच्या या गुन्हासह तीन ठिकाणी दुचाकी चोरल्याचीही कबुली दिली. पोलिसांनी तीन दुचाक्या आणि चांदीचे दागिने असा एकूण एक लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलीस उपायुक्त अक्षय शिंदे, सहायक आयुक्त नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली हुडकेश्वरचे ठाणेदार प्रतापराव भोसले यांच्या नेतृत्वात सहायक निरीक्षक स्वप्निल भुजबळ, हवालदार दीपक मोरे, तसेच राजेश मोरे, राजेश धोपटे, प्रफुल्ल वाघमारे, दीपक तऱ्हेकर, मिथुन नाईक यांनी ही कामगिरी बजावली.

---

Web Title: Police nab a gang of thieves