चाकु घेऊन फिरला पोलिसांनी तुरुंगात टाकला; दुचाकीसह ५० हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त
By दयानंद पाईकराव | Updated: April 13, 2024 19:59 IST2024-04-13T19:59:17+5:302024-04-13T19:59:41+5:30
शुक्रवारी १२ एप्रिलला सायंकाली ६.१५ ते ७.३० दरम्यान गुन्हे शाखेच्या युनिट ३ चे पथक गुन्हेगारांच्या शोधात गस्त घालत होते.

चाकु घेऊन फिरला पोलिसांनी तुरुंगात टाकला; दुचाकीसह ५० हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त
नागपूर : चाकु घेऊन फिरणाऱ्या आरोपीला गुन्हे शाखेच्या युनिट ३ ने अटक करून त्याच्या ताब्यातून चाकु आणि दुचाकीसह ५० हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तौसिफ इब्राहिम शेख (२२, रा. बाजार चौक, मनसर रामटेक) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तो सध्या ताजबाग येथे राहतो.
शुक्रवारी १२ एप्रिलला सायंकाली ६.१५ ते ७.३० दरम्यान गुन्हे शाखेच्या युनिट ३ चे पथक गुन्हेगारांच्या शोधात गस्त घालत होते. तेवढ्यात त्यांना इतवारी मालधक्काकडे जाणाऱ्या रस्त्याशेजारी आरोपी प्लेझर गाडीवर चाकु घेऊन फिरत असल्याची माहिती मिळाली. पथकाने तेथे जाऊन आरोपीची व त्याच्या वाहनाची झडती घेतली असता दुचाकीच्या डिक्कीत ३०० रुपये किमतीचा लोखंडी चाकु आढळला. दुचाकीबाबत विचारना केली असता त्याने कुठलेही समाधानकारक उत्तर दिले नाही. त्यामुळे आरोपीच्या ताब्यातून चाकु व दुचाकी असा ५० हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सहपोलिस आयुक्तांच्या मनाई आदेशाचे उल्लंघन केल्यामुळे आरोपीविरुद्ध कलम ४/२५, सहकलम १३५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.