पोलिसाशी हुज्जत घालणे पडले महागात
By Admin | Updated: August 6, 2015 02:40 IST2015-08-06T02:40:51+5:302015-08-06T02:40:51+5:30
प्लॅटफार्म तिकीट न घेता रेल्वेस्थानकावर संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या आणि पोलिसाशी हुज्जत घालणाऱ्या व्यक्तीच्या चांगलेच अंगलट आले.

पोलिसाशी हुज्जत घालणे पडले महागात
नागपूर : प्लॅटफार्म तिकीट न घेता रेल्वेस्थानकावर संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या आणि पोलिसाशी हुज्जत घालणाऱ्या व्यक्तीच्या चांगलेच अंगलट आले. रेल्वे न्यायालयाने त्यास ८०० रूपये दंड आणि सायंकाळी ६ वाजेपर्यंत कोर्टात उभे राहण्याची शिक्षा सुनावली.
धनराज गजानन ठेंग (२७) रा. नाईकतलाव नागपूर हा नागपूर रेल्वेस्थानकावर बुधवारी पहाटे ४ वाजता संशयास्पदरीत्या फिरत होता. ड्युटीवर असलेले रेल्वे सुरक्षा दलाचे हवालदार राजेंद्र गुजर यांना त्याच्यावर शंका आली. त्याची अधिक चौकशी केली असता त्याच्या जवळ प्लॅटफार्म तिकीट नसल्याचे स्पष्ट झाले. रेल्वेस्थानकावर कशासाठी आला हे विचारले असता त्याने रेल्वे सुरक्षा दलाच्या हवालदाराशी हुज्जतबाजी केली. त्यामुळे त्यास पकडून रेल्वे सुरक्षा दलाच्या ठाण्यात आणण्यात आले. तेथे त्याच्या विरुद्ध रेल्वे अॅक्ट १४५, १४७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. त्यास रेल्वे न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यास ८०० रुपये दंड आणि सायंकाळी ६ पर्यंत कोर्टात उभे राहण्याची शिक्षा सुनावली. (प्रतिनिधी)