शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

खून करून अपघाताचा बनाव, तब्बल १४ वर्षानंतर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2021 13:52 IST

अपघाताचा बनाव करुन विशाल पैसाडे याची हत्या केल्याप्रकरणात खापरखेडा पोलिसांनी १४ वर्षानंतर आरोपी रणजित सफेलकरसह सहा जणांवर खुनाचा गुन्हा नाेंदवून तपासाला सुरुवात केली आहे.

ठळक मुद्देवारेगाव परिसरातील घटना

लाेकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : वारेगाव (ता. कामठी) शिवारात २२ मार्च २००७ च्या रात्री विशाल पैसाडे, रा. कामठी याचा मृतदेह आढळून आला हाेता. त्याचा मृत्यू अपघातात झाल्याची नाेंद त्यावेळी पाेलिसांनी केली हाेती. मात्र, विशालचा मृत्यू अपघाती नसून, त्याचा खून करून अपघाताचा बनाव करण्यात आला हाेता, हे नुकतेच स्पष्ट झाल्याने खापरखेडा पाेलिसांनी तब्बल १४ वर्षे ९ महिन्यानंतर या प्रकरणात खुनाचा गुन्हा नाेंदवून तपासाला सुरुवात केली आहे.

या खून प्रकरणात खापरखेडा पाेलिसांनी रणजित हलके सफेलकर (४७, रा. कामठी), विनय ऊर्फ गोलू द्वारकाप्रसाद बाथव (४२, रा. हंसापुरी, छोटी खदान, नागपूर), हेमंत लालबहादुर गोरखा (४८, रा. न्यू येरखेडा, ता. कामठी), राजू विठ्ठल भद्रे (५०, रा. भांडे प्लॉट, नागपूर), संजय ऊर्फ संजू विठ्ठल भद्रे (४८, रा. भांडे प्लॉट, नागपूर), गौरव बबन झाडे (३२, रा. सोमवारी क्वाॅर्टर, नागपूर) व तुषार दलाल यांच्यावर खुनाचा गुन्हा नाेंदविला आहे.

रणजित सफेलकरने २२ मार्च २००७ च्या रात्री कल्लू सफेलकरच्या माध्यमातून विशाल पैसाडे याला स्वत:च्या घरी बाेलावले हाेते. त्याने विनय बाथवच्या मदतीने राजू भद्रेची एमएच-३१/सीएम-६२९६ क्रमांकाची स्काॅर्पिओ भिलगाव येथे बाेलावली हाेती. साेबतच हेमंत गोरखा यालाही तेथे बोलावले हाेते. विशाल त्याच्या एमएच-३१/एई-८१६२ क्रमांकाच्या स्कूटरने रात्री ९ वाजताच्या सुमारास रणजित सफेलकरच्या सांगण्यावरून त्याच्या घरून रणजित सफेलकरसोबत बोरियापुरा कामठी भिलगावला गेला हाेता. तिथे सर्व जण दारू प्यायले. त्याच ठिकाणी विशालला जबर मारहाण करण्यात आली.

पुढे रणजित सफेलकर, हेमंत गोरखा, विनय बाथव या तिघांनी जखमी विशालला स्कॉर्पिओत बसवले व वारेगाव शिवारातील पुलाजवळ आणले. मोहम्मद आरिफ अन्सारी ऊर्फ आरीफ मुच्छड हा विशालची स्कूटर घेऊन रात्री १२.३० वाजताच्या सुमारास वारेगाव शिवारात पाेहाेचला. तिथे विशालला रोडवर झोपवून त्याच्या डोक्यावर स्कूटर ठेवली. रणजित सफेलकरच्या सांगण्यावरून विनय बाथवने स्कॉर्पिओ वेगाने चालवून स्कूटरला धडक देत विशालच्या अंगावरून नेली हाेती.

अनैतिक संबंधांचा संशय

विशाल पैसाडे हा रणजित सफेलकरचा भाऊ कल्लू सफेलकर याचा घनिष्ठ मित्र असल्याने त्याचे रणजित सफेलकरकडे नियमित येणे-जाणे होते. त्याचे आपल्या पत्नीसाेबत अनैतिक संबंध असल्याचा रणजित सफेलकरला संशय हाेता. त्यामुळे रणजित सफेलकर विशालवर नजर ठेवून हाेता. विशाल पैसाडे याची साथीदारांच्या मदतीने हत्या केली आणि त्याचा अपघाती मृत्यू झाल्याचा बनाव केला, अशी कबुली रणजित सफेलकरने पाेलिसांना दिली. बयाण नाेंदविण्यासाठी न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पाेलीस काेठडी सुनावली हाेती. त्यानंतर त्याची न्यायालयीन काेठडीअंतर्गत चंद्रपूर येथील तुरुंगात रवानगी करण्यात आली.

पाेलिसांना दिले खाेटे बयाण

विनय या घटनेची संपूर्ण माहिती पाेलिसांना सांगेल, अशी रणजित सफेलकर, राजू भद्रे, संजय भद्रे व तुषार दलाल या आराेपींना भीती हाेती. सत्य लपवून स्वतःला वाचवण्यासाठी विनयऐवजी गौरव बबन झाडे याला खापरखेडा पोलिसांकडे पेश केले हाेते. या प्रकरणातील प्रत्यक्षदर्शी विनय बाथव याने पाेलिसांना खोटे बयाण दिले हाेते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी