शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांच्या चुकीची ‘त्याला’ मिळाली शिक्षा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 23:34 IST

स्थानिक रामटेक  पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सत्रापूर शिवारात शीर नसलेल्या महिलेचा मृतदेह आढळला होता. पत्नीचा खून केला या प्रकरणात पोलिसांकडून एकाला गोवले जाऊन त्याची मध्यवर्ती कारागृहात रवानगीही करण्यात आली. मात्र त्यानंतर पत्नी जिवंत असल्याचे समोर येताच त्याला सोडण्यात आले.

ठळक मुद्देपत्नी जिवंत असल्याने प्रकरण उलटले : पोलिसांवरच कारवाईची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्थानिक रामटेक  पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सत्रापूर शिवारात शीर नसलेल्या महिलेचा मृतदेह आढळला होता. पत्नीचा खून केला या प्रकरणात पोलिसांकडून एकाला गोवले जाऊन त्याची मध्यवर्ती कारागृहात रवानगीही करण्यात आली. मात्र त्यानंतर पत्नी जिवंत असल्याचे समोर येताच त्याला सोडण्यात आले. त्याच्याविरुद्धची चार्जशिटही मागे घेतल्याची माहिती आहे. पोलिसांच्या चुकीमुळे एका निष्पाप व्यक्तीला शिक्षा भोगावी लागली. त्यामुळे पोलिसांवरच कारवाई करावी, अशी मागणी नागपूर जिल्हा काँग्रेस कमेटीचे महासचिव उदयसिंह यादव यांनी केली आहे.पोलिसांवरच कारवाई करण्यात यावी, या आशयाचे निवेदन यादव यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभेचे विरोधी पक्षनेता राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेता धनंजय मुंंडे आदींकडे सोपविले. दीपक जयदेव सोमकुवर (३५, रा. भागेमहारी) असे निर्दोष व्यक्तीचे नाव आहे. आॅक्टोबर २०१७ मध्ये शीर (मुंडके) नसलेल्या महिलेचा मृतदेह सत्रापूरनजीकच्या बोंदरी गावात आढळला. खून करून ओळख पटू न देण्याच्या इराद्याने करण्यात आलेल्या या कृत्याने सर्वत्र खळबळ उडाली होती. या प्रकरणी पोलिसांनी भांदविच्या कलम ३०२, २०१ अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. मृतदेहाच्या वर्णनावरून ती शिल्पा दीपक सोमकुवर (३२) असावी, असा पोलिसांना संशय आला. त्यामुळे नागपूर ग्रामीण पोलिसांनी दीपक सोमकुवरला अटक केली. त्याचे आणि त्याच्या पत्नीचे भांडण झाले, त्यातून त्याने तिचा खून केला, असा बनाव पोलिसांनी केला. त्या प्रकरणात न्यायालयीन आदेशानुसार दीपकची मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली.मध्यंतरीच्या काळात शिल्पा सोमकुवर ही पोलिसांना जिवंत आढळली. दीपक आणि शिल्पा यांच्यामध्ये भांडण झाल्याने ती कामठी येथे तिच्या नातेवाईकाकडे वास्तव्यास होती. ती जिवंत आढळताच पोलिसांची भंबेरी उडाली. मुंडके नसलेला तो मृतदेह दुसऱ्याच महिलेचा असल्याचे स्पष्ट झाल्याने पोलिसांनी दीपकला निर्दोष सोडले. परंतु त्याला या प्रकरणात नाहक गोवले गेले, शिक्षा भोगावी लागली. त्यामुळे दोषी पोलिसांवर कारवाई करावी, अशी मागणी उदय यादव यांनी केली आहे.

टॅग्स :Crimeगुन्हाPoliceपोलिस