पोलीस बंदोबस्तात ३४ थकबाकीदारांची वीज कापली ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:09 IST2021-03-26T04:09:07+5:302021-03-26T04:09:07+5:30

नागपूर : महावितरणने वीज थकबाकीदारांविरुद्धची मोहीम पुन्हा एकदा सुरू केली आहे. गेल्या दोन दिवसापासून ही मोहीम सुरू झाली आहे. ...

Police cut off power to 34 arrears | पोलीस बंदोबस्तात ३४ थकबाकीदारांची वीज कापली ()

पोलीस बंदोबस्तात ३४ थकबाकीदारांची वीज कापली ()

नागपूर : महावितरणने वीज थकबाकीदारांविरुद्धची मोहीम पुन्हा एकदा सुरू केली आहे. गेल्या दोन दिवसापासून ही मोहीम सुरू झाली आहे. गुरुवारी ३४ थकबाकीदारांची वीज पोलीस बंदोबस्तात कापण्यात आली. यादरम्यान नऊ वीजचोरीही पकडण्यात आल्या.

१ एप्रिल २०२० पासून ज्यांनी वीज बिल भरलेले नाही, अशा थकबाकीदारांविरुद्ध महावितरणतर्फे वीज कनेक्शन कापण्याची मोहीम उघडण्यात आली आहे. याला विरोधही होत आहे. दरम्यान, नागपूर शहरात कोरोनाचा संसर्ग वाढल्याने लॉकडाऊन जाहीर झाले. लॉकडाऊनदरम्यान शहरातील वीज कापण्याची मोहीम बंद करण्यात आली. परंतु २२ तारखेपासून अनेक गोष्टी शिथिल करण्यात आल्या. सर्व दुकाने सुरू झाली. त्यामुळे महावितरणने पुन्हा थकबाकीदारांविरुद्धची मोहीम सुरू केली. यासाठी पोलीस बंदोबस्त मागण्यात आला. पोलिसांनी बंदोबस्त दिल्याने बुधवारपासून मोहीम सुरू झाली. परंतु याला नेहमीप्रमाणे विरोधही झाला. परंतु महावितरणने मोहीम सुरूच ठेवली आहे. गुरुवारी दुसऱ्या दिवशी राजीव गांधीनगर, संजयबाग कॉलनी, विनोबा भावेनगर, वांजरा, रहमतनगर, बाबा दिवानानगर आदी परिसरात ही मोहीम राबविण्यात आली. यावेळी पोलीस बंदोबस्तात ३४ थकबाकीदारांची वीज कापण्यात आली. त्यांच्यावर एकूण १९.५८ लाखाची थकबाकी होती. यादरम्यान नऊ ग्राहकांनी ८५ हजाराचे बिलही भरले.

Web Title: Police cut off power to 34 arrears