शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात  पोलीस-गुन्हेगारांचा ‘याराना’ : पोलीस आयुक्तांकडून गंभीर दखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2018 21:47 IST

कुख्यात गुन्हेगारांसह याराना दाखवत नाचगाणे करणाऱ्या पोलीस शिपायाच्या कृत्याची पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी गंभीर दखल घेतली असून, त्याची चौकशी करण्याचे आदेश पोलीस उपायुक्तांना दिले आहे. त्यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देव्हायरल व्हिडीओच्या चौकशीचे आदेश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कुख्यात गुन्हेगारांसह याराना दाखवत नाचगाणे करणाऱ्या पोलीस शिपायाच्या कृत्याची पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी गंभीर दखल घेतली असून, त्याची चौकशी करण्याचे आदेश पोलीस उपायुक्तांना दिले आहे. त्यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.अनेक वादग्रस्त प्रकरणात नाव पुढे आल्याने चर्चेचा विषय ठरलेला पोलीस कर्मचारी जयंत शेलोट हा ताजबागमधील गुंड आबू, विदर्भात सर्वात मोठा जुगार अड्डा चालविणारा कुख्यात तडीपार अशोक बावाजी (यादव) आणि इतर काही गुन्हेगारांसह नाचगाणे करीत असल्याचा व्हीडीओ बुधवारी व्हायरल झाला. तेरे जैसा यार कहां... या गाण्यावर गुन्हेगार आणि पोलीस शिपायातील याराना व्हिडीओत दिसून येत असल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली. प्रसारमाध्यमातून पोलीस आणि गुन्हेगारांमधील याराना आज प्रकाशित झाल्याने संतापजनक प्रतिक्रिया उमटली. पत्रकारांनी या संबंधाने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे विचारणा केली. त्यामुळे अनेक अधिकाऱ्यांची गोची झाली. एकूणच प्रकाराची पोलीस आयुक्त डॉ. भुषणकुमार उपाध्याय यांनी गंभीर दखल घेतली. त्यांनी पोलीस कर्मचारी जयंत शेलोट आणि गुन्हेगारांमधील यारानाची चौकशी करण्याचे आदेश जारी केले. त्यानुसार, पोलीस उपायुक्त राहुल माकणीकर यांनी सहायक आयुक्त राजरत्न बन्सोड यांना या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहे.कधीची पार्टी, कधीचा व्हिडीओपोलीस आणि गुन्हेगाराच्या नाचगाण्याचा हा व्हिडीओ कुख्यात अबूच्या बर्थ डे पार्टीदरम्यानचा असल्याचे समजते. मात्र, ती पार्टी नेमकी कधी आणि कुठे होती. त्यात आणखी कोणते गुन्हेगार आणि किती पोलीस कर्मचारी होते, त्याची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहे. चौकशी अहवाल दोन ते तीन दिवसात येण्याची शक्यता असून, त्यानंतर दोषी पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई होण्याचे संकेत आहे.तडीपार बावाजीची नागपुरात मौजमजाअशोक यादव उर्फ बावाजीविरुद्ध जुगाराचे अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याच्या अड्ड्यावर अनेकदा पोलिसांनी धाड टाकून पकडले आहे. चार महिन्यांपूर्वीच त्याला सहा महिन्यासाठी तडीपार करण्यात आले होते. या व्हीडिओमध्ये बावाजीचीही उपस्थिती दिसते. त्यामुळे पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह लागले आहे. तडीपार गुन्हेगारांना पकडण्यासाठी पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी प्रत्येक पोलीस ठाण्यात हिट स्क्वॉडची निर्मिती करण्याचे आदेश दिले आहे, हे येथे विशेष!

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस