शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

नागपुरातील हुडकेश्वर, मानकापूर, गणेशपेठमध्ये पोलिसांवर हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2019 21:20 IST

मंगळवारी आणि बुधवारी शहरात तीन ठिकाणी पोलिसांवर हल्ला करण्याच्या घटना घडल्या. यामुळे शहर पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. आरोपींनी मारहाण करून पोलिसांच्या वाहनावर दगडफेक केली. यात पोलिसांनी १२ आरोपींना अटक केली आहे.

ठळक मुद्देपोलीस दलात खळबळ : १२ आरोपींना केली अटक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मंगळवारी आणि बुधवारी शहरात तीन ठिकाणी पोलिसांवर हल्ला करण्याच्या घटना घडल्या. यामुळे शहर पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. आरोपींनी मारहाण करून पोलिसांच्या वाहनावर दगडफेक केली. यात पोलिसांनी १२ आरोपींना अटक केली आहे.पहिली घटना हुडकेश्वरच्या नरसाळा येथे घडली. दर्शन कॉलनी येथील रहिवासी धीरज रमेश बांगरे (३६) यांची पत्नी भांडण झाल्यामुळे दोन वर्षापासून नरसाळात राहते. धीरज मंगळवारी रात्री सासूरवाडीत गेला. त्याने पत्नी आणि तिच्या कुटुंबीयांशी वाद घातला. त्याने पत्नी आणि सासूला मारहाण केली. गोंधळ झाल्यामुळे वस्तीतील नागरिक गोळा झाले. ते मारहाण करू शकतील अशी शंका आल्यामुळे धीरजने आपला भाऊ नीरज बांगरे, त्याची पत्नी वर्षा आणि रजनीला बोलावले. सोबतच धीरजने पोलीस नियंत्रण कक्षाला सूचना दिली. नियंत्रण कक्षाच्या सूचनेवरून हुडकेश्वरचे पोलीस शिपाई प्रमोद हे घटनास्थळी पोहोचले. त्यांना धीरज गोंधळ घालत असल्याचे समजताच त्यांनी त्याला तेथून निघून जाण्यास सांगितले. त्यामुळे धीरज आणि त्याच्या कुटुंबीयांनी प्रमोदला घेराव घालून मारहाण सुरू केली. प्रमोदच्या सूचनेवरून ठाण्यातील महिला उपनिरीक्षक सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचल्या. त्यांनी धीरज आणि त्याच्या कुटुंबीयांना समजविण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांनी शांत होण्याऐवजी त्यांच्याशीच वाद घातला. महिला उपनिरीक्षकाचे केस पकडून मारहाण केली. धीरजच्या आईने पोलिसांनाच गुन्ह्यात अडकविण्याची धमकी दिली. त्यानंतर पोलिसांनी आरोपींना अटक केली. यामुळे नरसाळात तणाव निर्माण झाला होता. महिला उपनिरीक्षकाच्या तक्रारीवरून आरोपींविरुद्ध पोलिसांशी मारहाण करणे, धमकी देणे आणि धीरजच्या पत्नीच्या तक्रारीवरून मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. दुसरी घटना मानकापूरच्या फरस गेटजवळ घडली. कोतवालीचे ठाणेदार उमेश बेसरकर झिंगाबाई टाकळीत राहतात. मंगळवारी त्यांची रात्रीची ड्युटी होती. कोतवाली ठाण्याचा शिपाई विकास यादव रात्री ११.३० वाजता पोलीस जीप क्रमांक एम.एच. ३१, डी. झेड-०३८३ मध्ये चालक गौतमसोबत बेसरकर यांना घेण्यासाठी त्यांच्या घरी जात होता. त्यावेळी फरस गेटजवळ गोधनी, सूर्यवंशी ले-आऊट येथील रहिवासी वीरेंद्र दिनेश काळबांडे आपल्या साथीदारांसह गोंधळ घालत होते. रस्त्यावर गोंधळ सुरू असल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. हे पाहून पोलिसांनी विकास यादव आणि वीरेंद्र काळबांडे याना रस्त्यातून बाजूला होण्यास सांगितले.त्यामुळे आरोपी संतापले. त्यांनी पोलिसांच्या वाहनावर दगडफेक केली. आरोपींनी दगड फेकल्यामुळे पोलीस वाहनाचा काच फुटुन गौतम किरकोळ जखमी झाले. आरोपींनी जीपमधील वायरलेस सेट तोडला. यामुळे परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाली. विकास यादव यांनी हिमतीने वीरेंद्र काळबांडे यास अटक केली. त्यानंतर वीरेंद्रचे साथीदार हिमांशु ऊर्फ पिन्नी जगदिश कनोजिया (१९) रा. छोटा धोबीपुरा, सदर जॉन्सन ऊर्फ रॉनी मायकल अंथोनी (२१), चेतन जगदीश रामटेके (२३) रा. बेलिशॉप क्वॉर्टर मोतीबाग, हिमांशु चंद्रशेखर मंतापूरवार (२४) गीतानगर, मानकापूर यांना अटक करण्यात आली. तिसरी घटना बुधवारी दुपारी १ वाजता गणेशपेठच्या बसस्थानक परिसरात घडली. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या ऑटोचालकांनी जामरची कारवाई करणाऱ्या दोन वाहतूक पोलिसांना मारहाण करून जखमी केले. किशोर धपके आणि प्रकाश सोनोने अशी जखमी वाहतूक पोलिसांची नावे आहेत. दोघेही जामर दलात तैनातीस आहेत. त्यांनी आरोपी सोनू कांबळे रा. बेलतरोडी आणि मयुर राजुरकर रा. रामबाग यांच्या ऑटोला जामर लावले. यामुळे दोन्ही ऑटोचालक संतापले. त्यांनी वाहतूक पोलिसांना लाथाबुक्क्यांनी मारहाण सुरु केली. दुपारची वेळ असल्यामुळे नागरिकांची गर्दी होऊन तणाव निर्माण झाला. काही नागरिकांनी या घटनेची आपल्या मोबाईलमध्ये चित्रीकरण केले. घटनेची माहिती मिळताच झोन क्रमांक ३ चे उपायुक्त राहुल माकणीकर, वाहतूक पोलीस उपायुक्त राजतिलक रोशन हे घटनास्थळी पोहोचले. त्यांनी आरोपींना अटक केली. जखमी पोलिसांना मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले.२४ तासात चार घटनापोलिसांना मारहाण केल्याच्या २४ तासात चार घटना घडल्या आहेत. मंगळवारी दुपारी संविधान चौकात अ‍ॅक्टिव्हावर स्वार मो. मोबिन अन्सारी यांनी वाहतुक पोलीस नीलेश चौधरी (५१) यांच्यावर हल्ला केला. चौधरी यांना मारहाण करून पळून जाणाऱ्याअन्सारी यांना नागरिकांनी पकडून त्याची पिटाई केली होती. या घटनांमुळे पोलिसांमध्ये रोष निर्माण झाला आहे. चारही घटना नागरिकांचा संयम सुटल्यामुळे घडल्या आहेत. पोलीस आपले कर्तव्य बजावत होते. अशा वेळी त्यांना मारहाण करणे गंभीर आहे. मानकापूर, हुडकेश्वर आणि गणेशपेठच्या घटनांमधील आरोपी नशेत होते.

 

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीसnagpurनागपूर