लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : क्रिकेट खेळण्यापासून मनाई केल्यामुळे आरोपींनी पोलिसांवरच हल्ला केला. गेल्या तीन दिवसातील ही दुसरी घटना आहे.ही घटना वर्धा रोडवरील खापरी येथे घडली. सोनेगाव पोलीस ठाण्याचे शिपाई सूरज निंबाळकर मंगळवारी रात्री ७.३० वाजता खापरी परिसरात पेट्रोलिंग करीत असताना आपल्या दुचाकीने जात होते. त्यांना काही युवक रस्त्यावर क्रिकेट खेळताना दिसून आले. सूरज यांनी त्यांना मनाई केल्याने ते निघूनही गेले. त्यानंतर सूरज गस्त घालत मेट्रो स्टेशनकडे निघाले. ते परत गेल्यावर तेच युवक रस्त्यावर बसलेले दिसले. सूरजने त्यांना घरी जाण्यास सांगितले. त्यावेळी त्यांच्यातील सय्यद अली, त्याचा भाऊ अमजद अली व राज नेवारे हे संतप्त झाले. त्यांनी शिवीगाळ करीत सूरजवर हल्ला केला. त्याला लाथाबुक्कीने मारत दगड मारून जखमी करून ते फरार झाले. याची माहिती सोनेगाव व बेलतरोडी पोलिसांना मिळाली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध सरकारी कर्मचाऱ्यांवर हल्ला केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला. आरोपी सोनेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुख्यात गुन्हेगार आहे. लॉकडाऊन दरम्यान पोलीस कर्मचाऱ्यांवर हल्ला केल्याची तीन दिवसातील ही दुसरी घटना आहे. शनिवारी कळमना येथील विजयनगरमध्ये क्रिकेट खेळणाऱ्यांना मनाई केल्याने पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला करण्यात आला. पोलीस लॉकडाऊन यशस्वी करण्यासाठी २४ तास रस्त्यावर ड्युटी करीत आहे, अशात त्यांच्यावर हल्ले करणे गंभीर बाब आहे.
नागपुरात गुडांकडून पोलिसांवर हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2020 00:54 IST
क्रिकेट खेळण्यापासून मनाई केल्यामुळे आरोपींनी पोलिसांवरच हल्ला केला. गेल्या तीन दिवसातील ही दुसरी घटना आहे.
नागपुरात गुडांकडून पोलिसांवर हल्ला
ठळक मुद्देतीन दिवसात दुसरी घटना