शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील मोतीबाग परिसरात गुंडांकडून पोलिसांवर हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2018 01:04 IST

मोतीबाग परिसरात अवैध धंद्यावर छापामार कारवाई क रण्यासाठी पोहचलेल्या पोलिसांवर गुंडांनी हल्ला केला. हल्ला इतका भीषण होता की, पोलिसांना त्यातून आपला जीव वाचवत पळावे लागले. ही घटना ३१ जुलैच्या रात्री घडली. पोलिसांच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांकडूनच ही घटना दाबून ठेवण्यात आली.

ठळक मुद्देअवैध धंद्यावर करण्यात आलेल्या कारवाईतून घडला प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मोतीबाग परिसरात अवैध धंद्यावर छापामार कारवाई क रण्यासाठी पोहचलेल्या पोलिसांवर गुंडांनी हल्ला केला. हल्ला इतका भीषण होता की, पोलिसांना त्यातून आपला जीव वाचवत पळावे लागले. ही घटना ३१ जुलैच्या रात्री घडली. पोलिसांच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांकडूनच ही घटना दाबून ठेवण्यात आली.सूत्रानुसार पहेलवान बाबा दरगाँह जवळ कालू नावाच्या गुंडाचा दबदबा आहे. तो फायरींगसह अनेक कारवाईमध्ये लिप्त आहे. काही दिवसांपूर्वी तो कारागृहातून जमानत मिळवून बाहेर आला आहे. कालूचा मोतीबाग परिसरात दारू, जुगार व मटका व मादक पदार्थाच्या विक्रीचा अड्डा आहे. त्याच्या साथीदाराने परिसरात असलेल्या रेल्वे क्वॉर्टरवर कब्जा केला आहे. ३१ जुलै रोजी रात्री पोलीस पथकाने कालूच्या अड्ड्यावर छापा टाकला. पोलिसांना बघून कालू व त्याचे साथीदार संतप्त झाले. त्यांनी पोलिसांवर जोरदार दगडफेक केली. त्यामुळे पोलीस मागे हटले. दगडफेकीत जखमी होऊ नये म्हणून तेथून पाय काढला. जवळच एका चहाच्या टपरीजवळ एकत्र झाले. पोलीस चहाच्या टपरीवर उभे असल्याची माहिती पडताच गुंड तिथे पोहचले. त्यांनी टपरीवर जोरदार दगडफेक केली. त्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता. घटनेची माहिती मिळताच पाचपावली पोलीस घटनास्थळी पोहचले. त्यांनी टपरी चालकाला घटनेची तक्रार देण्यास सांगितले. पण टपरी चालकाने तक्रार करण्यास नकार दिला. त्यामुळे पोलीस रिकाम्या हाताने परत गेले.पाच महिन्यापूर्वी गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यावरसुद्धा इप्पा गँगने हल्ला केला होता. इप्पा गॅँगला पकडण्यासाठी गेलेले एपीआय ज्ञानेश्वर भदोडकर व त्यांच्या पथकावर हल्ला केला. त्यात पोलिसांचे वाहन क्षतिग्रस्त झाले होते. त्यानंतर पोलिसांनी इप्पा गँगच्या १३ गुंडावर मकोकाची कारवाई केली होती. यातील पाच आरोपी पोलिसांच्या हाती लागले. या प्रकरणात आरोपींचे नाव कमी केल्यामुळे पोलिसांची फजिती झाली होती. लोकमतने सर्वात पहिले हे प्रकरण पुढे आणले होते. बुधवारी पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी पदभार स्वीकारल्यानंतर गुंडांना संरक्षण देणार नाही, यापुढे त्यांची खैर नाही, असा दावा केला आहे. डॉ. उपाध्याय यांच्या शैलीशी नागपूरकर चांगलेच परिचित आहे. त्यामुळे आता गुंडाची खैर नाही, असा विश्वास नागरिकांना आहे.

 

टॅग्स :Crimeगुन्हाPoliceपोलिस