शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात वाळू तस्करांवर पोलिसांची धडक कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 19:45 IST

पोलीस उपायुक्त नीलेश भरणे यांनी वाळू तस्करांवर धडक कारवाई करून लाखोंची रेती जप्त केली. शुक्रवारी सकाळपासून दिघोरी ते उमरेड मार्गावर पोलिसांनी चालविलेल्या या कारवाईमुळे वाळू तस्करांमध्ये प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देलाखोंची वाळू जप्त : तस्करांमध्ये खळबळ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पोलीस उपायुक्त नीलेश भरणे यांनी वाळू तस्करांवर धडक कारवाई करून लाखोंची रेती जप्त केली. शुक्रवारी सकाळपासून दिघोरी ते उमरेड मार्गावर पोलिसांनी चालविलेल्या या कारवाईमुळे वाळू तस्करांमध्ये प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे.शासनाचा लाखोंचा महसूल बुडवून रेती चोरून आणायची. ती रात्रीच्या वेळी रस्त्याच्या बाजूला खाली करायची. त्यानंतर जशी मागणी आहे, त्याप्रमाणे दामदुप्पट भाव लावून ती विकायची, असा वाळू माफियांचा फंडा आहे. पोलीस, महसूल खाते आणि आरटीओतील काही जणांना हाताशी धरून शासनाला कोट्यवधींचा फटका देण्याची वाळू तस्करांची ही नेहमीची पद्धत आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ओव्हरलोडचे काम सांभाळणाऱ्या आदिल नामक दलालाकडून तस्करांना कारवाई न करण्याची हमी मिळाल्याने वाळू तस्करांनी रेतीची चोरी-तस्करी जोरात सुरू केली आहे. रात्रीच्या वेळी घाटावरून चोरून आणलेली लाखोंची रेती दिघोरी-उमरेड मार्गावर दुतर्फा साठवून ठेवलेली आहे. ही माहिती कळताच परिमंडळ चारचे उपायुक्त नीलेश भरणे यांनी आपल्या सहकाऱ्यांना कारवाईचे निर्देश दिले. त्यानुसार, शुक्रवारी पहाटे ५ वाजतापासून कारवाईचा धडाका लावण्यात आला. नंदनवन तसेच परिसरातील आऊटर रिंगरोडने जाणारे रेतीने भरलेले १० ते १५ ट्रक पोलिसांनी पकडले. त्यात लाखो रुपये किमतीची रेती आहे. केवळ ट्रकमध्येच नव्हे तर रस्त्याच्या दुतर्फा, शेतात बेवारस अवस्थेत साठवून ठेवलेली रेती कुणाची आहे, त्याचीही पोलिसांनी चौकशी सुरू केल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.पोलिसांना टेन्शन, आरटीओ, महसूल विभाग बिनधास्त !शहरात जड वाहतूक करणाऱ्या वाहनांपासून अपघात होऊ नये म्हणून वरिष्ठ पोलीस अधिकारी वेगवेगळे उपक्रम राबवित आहेत. वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात आहे. दुसरीकडे ओव्हरलोड वाहनांना तसेच वाळू तस्करी रोखण्याची जबाबदारी असणारी आरटीओ आणि महसूल विभागाची मंडळी या गैरप्रकाराकडे डोळेझाक करीत आहे. गेल्या तीन आठवड्यांपासून आदिल आणि नितीन नामक दलाल कमालीचे सक्रिय झाले आहे. वाहनचालकांना त्यांनी चिरिमिरीच्या बदल्यात ओव्हरलोड वाहनांवर कारवाई होणार नाही, याची हमी दिल्याचीही चर्चा आहे. आरटीओच्या कथित दलालांकडून पाठबळ मिळाल्यामुळे वाळू तस्करांनी मोठ्या प्रमाणात (ओव्हरलोड) वाहनातून रेती, राखड, कोळशाची तस्करी चालविल्याचीही चर्चा या कारवाईच्या निमित्ताने सुरू झाली आहे.

 

टॅग्स :sandवाळूraidधाड