शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

लाहोरी, बॅरेल कॅफे व मार्टिनी लाऊंजवर पोलिसांची कारवाई, पहाटे चारपर्यंत होते सुरू, नियमावलीचे उघड उल्लंघन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2025 22:33 IST

Nagpur Crime News: नागपूर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिसांनी शहरातील बार, कॅफे व पब्ज यांना वेळेची मुदत आखून दिली आहे. मात्र, अनेक आस्थापनांकडून या मर्यादेचे पालन करण्यात येत नाही. अशाच तीन बार व पब्जवर पोलिसांनी कारवाई करीत त्यांना धक्का दिला आहे.

नागपूर - शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिसांनी शहरातील बार, कॅफे व पब्ज यांना वेळेची मुदत आखून दिली आहे. मात्र, अनेक आस्थापनांकडून या मर्यादेचे पालन करण्यात येत नाही. अशाच तीन बार व पब्जवर पोलिसांनी कारवाई करीत त्यांना धक्का दिला आहे. यात वारंवार कारवाई होऊनदेखील कुठलीच कारवाई न झालेल्या लाहोरी बार ॲण्ड रेस्टॉरंटचादेखील समावेश आहे. पहाटे चारपर्यंत हे तीनही बार-पब्ज-लाऊंज सुरू होते. अशा आस्थापनांचा परवाना कायमचाच निलंबित करण्याची हिंमत प्रशासनाने दाखवावी असा नागरिकांमध्ये सूर आहे.

पोलिसांनी रविवारी पहाटे चार वाजता ही कारवाई केली. यात अंबाझरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील धरमपेठ येथील बॅरल कॅफे, सीताबर्डी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कॉफी हाऊस चौकातील लाहोरी बार ॲण्ड रेस्टॉरंट तसेच मार्टिनी लाऊंज यांचा समावेश आहे. पोलिसांनी या आस्थापनांना रात्री दीड वाजण्याची मुदत आखून दिली आहे. ऑपरेशन थंडर राबवीत असताना पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी या मुदतीचे पालन करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, काही ठिकाणी याचे पालन होत नसल्याच्या तक्रारी आल्या होत्या. पोलिस आयुक्तांच्या सूचनेनुसार गुन्हे शाखा, तसेच संबंधित पोलिस ठाण्याचे संयुक्त पथक स्थापन करण्यात आले होते. त्यानुसार रविवारी पहाटे चार वाजता या तीनही ठिकाणी छापे टाकण्यात आले. तेथे ग्राहकांना सेवा पुरविल्या जात असल्याचे आढळून आले. रात्री दीड वाजल्यानंतरदेखील मद्य व अन्न पुरविले जात असल्याचे स्पष्ट झाले. उत्पादन शुल्क विभागाकडून बॅरेल कॅफेवर कारवाई करण्यात आली, तर लाहोरी बार व मार्टिनी लाऊंज येथे पोलिसांकडून कारवाई करण्यात आली.

नियमांचे उल्लंघन कराल तर खबरदारअशाप्रकारे नियमाचे उल्लंघन करून कायदा व सुव्यवस्थेला धोका निर्माण करणाऱ्या बाबी पोलिसांकडून खपवून घेतल्या जाणार नाही. बार, कॅफे, रेस्टॉरंट चालकांनी दिलेले वेळचे निर्बंध पाळावे. उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिस आयुक्तांनी दिला आहे. रात्री उशिरा सुरू असलेले आस्थापना किंवा बेकायदेशीर संचालन करणारे, मद्यविक्री करणाऱ्या तत्त्वांबाबत माहिती मिळाल्यास पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnagpurनागपूर