पोलीस शिपायाची धुंदीत अश्लील शेरेबाजी

By Admin | Updated: June 8, 2017 17:18 IST2017-06-08T17:18:50+5:302017-06-08T17:18:50+5:30

आकोली खरांगणा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या रामेश्वर आडे या पोलीस शिपायाने येथील बसस्टॉपवर मद्यधुंद अवस्थेत अश्लील शेरेबाजी केल्याने महिला प्रवाशांची कुचंबणा झाली.

Pokemon violation of policeman | पोलीस शिपायाची धुंदीत अश्लील शेरेबाजी

पोलीस शिपायाची धुंदीत अश्लील शेरेबाजी

आॅनलाईन लोकमत
वर्धा- आकोली खरांगणा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या रामेश्वर आडे या पोलीस शिपायाने येथील बसस्टॉपवर मद्यधुंद अवस्थेत अश्लील शेरेबाजी केल्याने महिला प्रवाशांची कुचंबणा झाली. हा प्रकार गुरुवारी दुपारी ३ च्या सुमारास घडला.
आडे हा शिपाई या मार्गावरून नेहमीच ये-जा करतो. आज दुपारी येथील बसस्टॉपजवळ त्याने आपली दुचाकी रस्त्यातच उभी करून महिला प्रवाशांकडे पाहून अश्लील शेरेबाजी सुरू केली. तसे करून त्याने पुढे आमगावनजीकच्या रस्त्यावर उभे राहून हाच कित्ता गिरविला. या प्रकाराची माहिती ठाणेदार प्रशांत पांडे यांना कळताच त्यांनी पोलीस शिपायाच्या शोधार्थ पोलीस रवाना केले. मात्र त्याचा सुगावा लागल्याने आडे याने काढता पाय घेतला.

Web Title: Pokemon violation of policeman