शहरं
Join us  
Trending Stories
1
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
2
आजचे राशीभविष्य- ४ ऑक्टोबर २०२५: पैशांच्या गुंतवणुकीवर लक्ष द्या, कमी वेळात जास्त लाभ घेण्याची लालसा सोडा
3
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
4
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
5
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
6
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
7
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
8
नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव; नामकरणासाठी पंतप्रधान मोदी सकारात्मक : मुख्यमंत्री 
9
अमेरिकेच्या टॅरिफ संकटात भारतासह युरोपियन देशांची भूमिका मोलाची; स्वेन ओस्टबर्ग यांचे मत
10
संपादकीय : आता खरी लढाई! मेळावे झाले, घोषणा झाल्या... आता सीमोल्लंघन कधी?
11
पाणंद रस्ते मोकळे करा,  तरच मिळेल सरकारी लाभ; प्रस्ताव विचाराधीन
12
सोमवारपासून परतीच्या सरी; चक्रीवादळ 'शक्ती'मुळे महाराष्ट्रात पुन्हा पाऊस? हवामान खात्याचा नेमका अंदाज काय?
13
डोनाल्ड ट्रम्प आता सिनेमावाल्यांवर का भडकले?
14
मनोज जरांगेंचा १९९४ च्या जी. आर. विरोधात एल्गार! 'या' दोन मोठ्या जातींच्या आरक्षणावर बोलले
15
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
16
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
17
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
18
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
19
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
20
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश

देशभरातून रंगले ‘कविसंमेलन फ्रॉम होम’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2020 19:15 IST

आपण सगळे ‘कोरोना काल’मध्ये वावरतो आहोत. इथून पुढचा इतिहास लिहिला जाईल तो ‘प्री कोरोना’ आणि ‘पोस्ट कोरोना’ असा. या काळाचा जगतावर झालेला परिणाम, हा त्या इतिहासात अत्यंत महत्त्वाचा भाग असणार आहे.

ठळक मुद्देऑनलाईन मैफिलीतून झाला संवेदनेचा ऊहापोह

 

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आपण सगळे ‘कोरोना काल’मध्ये वावरतो आहोत. इथून पुढचा इतिहास लिहिला जाईल तो ‘प्री कोरोना’ आणि ‘पोस्ट कोरोना’ असा. या काळाचा जगतावर झालेला परिणाम, हा त्या इतिहासात अत्यंत महत्त्वाचा भाग असणार आहे. या काळाच्या पार्श्वभूमीवरच एकमेकांना भेटणे अवघड झाले आहे आणि अशात मैफिली रंगने तर दूरचीच बाब. मात्र, दुरावा मिटविणारी माध्यमे या अशा एकांतवासाला आधारवड ठरत आहेत. याच आधारवडीचा लाभ घेत रद्द करावी लागलेली काव्यमैफिल ‘कविसंमेलन फ्रॉम होम’ अशी रंगली. यात देशभरातून कवि सहभागी झाले.या कविसंमेलनात नागपूर, मुंबई, पुणे, अमरावती, अकोला, नाशिक, ग्वाल्हेर या भागातील डॉ. शरयु शहा, प्रा. सुनील जोशी, डॉ. उमा बोडस, डॉ. उज्वला चक्रदेव, निलेश कवडे, हरी धारकर, डॉ. मोना चिमोटे, भारती मोडक, प्रशांत त्रिभुवन, प्रशांत पनवेलकर, डॉ. शुचिता फडके, अनुपमा मुंजे, डॉ. विक्रांत तिकोणे, सना पंडित, मोहन पाटील हे कवी सहभागी झाले आणि संवेदनेचा ऊहापोह झाला. या ऑनलाईन मैफिलीच्या संचालनाची धूरा नागपूरच्या कवयत्री सना पंडित यांनी सांभाळली. विशेष म्हणजे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक विलगीकरण जपणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तेथे कविसंमेलनाचे आयोजन म्हणजे दिवास्वप्नच. पण, तंत्रज्ञानाची कांस धरत सृजनशीलतेला तंत्रज्ञानाची जोड देत व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून हे कविसंमेलन घडून आले. खरे सांगायचे तर साहित्यात रूची असलेल्या या मैत्रांच्या समूहानने कविसंमेलनाचे आयोजन करण्याचा निर्धार केला होता. त्याअनुषंगाने तयारी सुरू असतानाच लॉकडाऊनची घोषणा झाली आणि सगळे नियोजन फसले. तेव्हा पुण्यातल्या डॉ. रेखा देशमुख यांनी कल्पना मांडली ‘लाईव्ह ऑन लाईन कवी संमेलना’ची आणि लगेच उचलून धरली समूह संचालकद्वय प्रशांत पनवेलकर आणि डॉ. मोना चिमोटे यांनी. ‘वर्क फ्रॉम होम’च्या या कालावधीत ऑनलाईन मिटींग साठी वापरल्या जाणाऱ्या झुम या अ‍ॅपचा वापर करायचे ठरले आणि ही संपूर्ण प्रक्रीया मोहन पाटील यांनी पेलली. 

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसliteratureसाहित्य