नागपूर अधिवेशनातील कविता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:07 IST2020-12-27T04:07:31+5:302020-12-27T04:07:31+5:30
स्वैरपणे पाेहावे वाटे तुझिया प्रेम-जलींं आकुंचितपण बघुनि तुझे हे जीव हाेई वर खाली ।। स्वतंत्रतेची मूर्ति त्रिभुवनि म्हणुनी तुझी ...

नागपूर अधिवेशनातील कविता
स्वैरपणे पाेहावे वाटे तुझिया प्रेम-जलींं
आकुंचितपण बघुनि तुझे हे जीव हाेई वर खाली ।।
स्वतंत्रतेची मूर्ति त्रिभुवनि म्हणुनी तुझी कीर्ति
परवशतेच्या कांच कपाटी काय असावी वसती ।।
कठाेरतम जाे हिमनग जेव्हा तुझसी बंध घाली
तदुदर फाेडुनि तदां रक्षिलिस स्वतंत्रता तू अपुली ।।
त्याच तुवां अजि मुक्त व्हावया परास विनवावें
कर्मगती ही अशी आणखी कुठे शाेधण्या जावें ।।
स्वातंत्र्याचे दान कुणा कधि मागुनि कुणि दिधले
याचक वृत्ती साेड साेड ही- कुणी तुला हे कथिले ।।
ध्यानि आण सामर्थ्य आपुले स्वयंप्रकाशी गंगे
स्वतंत्रता मिळविण्या समर्था तूझी तूंच अभंगे ।।
०००००००००००००००००००००००००००००००००००००००००
(कवी : आनंदराव कृष्णाजी टेकाडे)
जय हिन्द देविची बाेला
हर हर महादेव बाेला ।।
गेला गेला राष्ट्र-धुरंधर म्हणुनि सकळ वदती
नश्वर काया केव्हातरि ती जायाची हाेती ।।
राष्ट्र-पुरुष ताे राष्ट्र संकटी साेडुनियां जाई
इतिहासाचा नियम असे हा पहा मागुती कांही ।।
अपूर्ण परि तन्मेनारथातें शेवटास न्याया
ताेच नियम कधि झटे तयांच्या अनुयायांची काया ।।
प्रताप गेला चित्तुरगडासी रिपू-करि ठेवाेनी
शिवबा जाई ऐन बहारी राष्ट्र पाेरके करूनी ।।
स्वतंत्रतेचे द्वारि नेउनी तेंवि ‘तिलक’ जाती
तयाभीतरी प्रवेशणे हे असलेल्यांच्या हाती ।।
स्वातंत्र्याचा दीप उजळिला परवशता नाशी
पहा तयाला निर्भयतेनें पुसुनि आंसवांसी ।।
त्या दीपाने इतर जगत निज घालवि तिमिराला
मर्दपणे आर्यांनाे हर हर महादेव बाेला
बाेला, हर हर महादेव बाेला ।।
लाे. टिळक महाराज की जय