शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

पंतप्रधानांनी दाखवली पुणे-अजनी-पुणे ‘हमसफर एक्स्प्रेस’ला हिरवी झेंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2019 21:34 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथे विविध विकास प्रकल्पांची आधारशिला ठेवली. या विकास कामांचे लोकार्पण करून पंतप्रधानांनी नवीन कामाचे बटन दाबून शुभारंभ केला. यावेळी त्यांनी पुणे-अजनी-पुणे हमसफर एक्स्प्रेसला हिरवी झेंडी दाखवून या रेल्वेच्या दौंड-मनमाड-भुसावळ-बडनेरा मार्गक्रमणाची घोषणाही केली.

ठळक मुद्देनागपुरात पालकमंत्र्यांनी दाखविली हिरवी झेंडी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथे विविध विकास प्रकल्पांची आधारशिला ठेवली. या विकास कामांचे लोकार्पण करून पंतप्रधानांनी नवीन कामाचे बटन दाबून शुभारंभ केला. यावेळी त्यांनी पुणे-अजनी-पुणे हमसफर एक्स्प्रेसला हिरवी झेंडी दाखवून या रेल्वेच्या दौंड-मनमाड-भुसावळ-बडनेरा मार्गक्रमणाची घोषणाही केली.ही गाडी आठवड्यातून एक दिवस असून एकदा अजनी व एकदा मुख्य स्थानकाहून सुटणार आहे. नागरिकांची पुणेसाठ़ी आणखी एका वेगवान गाडी सोडण्याची मागणी दीर्घ काळापासून होती, ती आज पूर्ण झाली.या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे राज्यपाल चे. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ रस्ते वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते. यावेळी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी सर्वांचे स्वागत केले.नागपुरात पालकमंत्र्यांनी दाखविली हिरवी झेंडीनागपुरात अजनी रेल्वे स्थानकावर अजनी-पुणे हमसफर एक्स्प्रेसला पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हिरवी झेंडी दाखवून या गाडीच्या प्रवासाचा शुभारंभ केला व गाडीतील प्रवाशांना सुखकर प्रवासाच्या शुभेच्छा दिल्या. अजनी रेल्वे स्थानकावर झालेल्या या कार्यक्रमाला महापौर नंदा जिचकार, खा. डॉ. विकास महात्मे, आ. कृष्णा खोपडे, आ.डॉ. मिलिंद माने, भाजपा नेते अरविंद गजभिये, रेल्वेचे अप्पर मंडल रेल प्रबंधक त्रिलोक कोठारी, मुख्य यांत्रिक अभियंता मनोज जोशी उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या वेळी रेल्वे प्रशासनाने पांढरकवड्याच्या पंतप्रधानांच्या कार्यक्रमाचे थेट प्रसारण अजनी स्थानकावर उपलब्ध केले होते.

 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीrailwayरेल्वे