शहरं
Join us  
Trending Stories
1
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
2
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
3
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी
4
"भारताच्या 'टीम' बद्दल बोला..."; 'त्या' खेळाडूचं नाव ऐकताच कपिल देवने पत्रकारांना सुनावलं
5
प्रियाने निधनाच्या आदल्या रात्रीच शंतनुची मालिका पाहिली अन्...बहिणीविषयी बोलताना सुबोध भावुक
6
"लढली ती...पण शेवटी कॅन्सरने तिचा घास घेतला", सुबोध भावेने सांगितल्या प्रिया मराठेच्या आठवणी
7
Rohit Godara : कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
8
Tarot Card: यशाचे शिखर गाठले तरी पाय जमिनीवर ठेवा, हे शिकवणार पुढचा आठवडा; वाचा टॅरो भविष्य!
9
Ind vs Pak Asia Cup 2025 Live: मोबाइलवर मोफत पाहू शकता मॅच; 'या' रिचार्ज प्लान्ससह मिळतेय संधी
10
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
11
पत्नीला पळवून नेल्याचा राग अनावर झाला; कोल्हापुरात पतीने घरात घुसून तरुणाला संपवला
12
कुजबुज: मोहित कंबोज यांचा संन्यास, सरनाईकांची टेस्ला खरेदी अन् बरंच काही...
13
Elphinstone Bridge: प्रभादेवी रेल्वेस्थानकावरील पुलावर अखेर 'हातोडा', पाडकामास प्रचंड बंदोबस्तात सुरूवात
14
अरे बापरे! घरात २ जण अन् १.६५ लाख लीटर पाण्याचं आलं बिल; भाडेकरूने मांडली व्यथा
15
अमेरिकन शेअर मार्केटला येणारे 'हॉर्ट अटॅक'; एक्सपर्टनं ३ कारणं देत दिला इशारा; कोणता दिला सल्ला?
16
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
17
Asia Cup 2025 IND vs PAK: भारत-पाक सामना टीव्हीवर दाखवू नका, फिल्म संबंधित संघटनेची मागणी
18
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
19
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
20
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन

पुलवामा घटनेबाबत पंतप्रधान मोदी यांनी उत्तर द्यावे; पटोलेंसह संजय राऊत यांची चौकशीची मागणी

By कमलेश वानखेडे | Updated: April 15, 2023 14:39 IST

देशातील जनतेतच्या मनात एक मोठा संशय मोदी सरकारबाबत निर्माण झालाय - पटोले

नागपूर : जम्मू काश्मिरचे चे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पुलवामा घटनेबाबत स्पष्ट केलेली भूमिका भयावह आहे. देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून घातक आहे. राष्ट्रद्रोह आहे. म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत देशाला उत्तर द्यावे, या घटनेची चौकशी व्हावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी शनिवारी केली.

पटोले म्हणाले, ज्या पद्धतीने पुलवामा घटनेमध्ये देशाच्या सुरक्षेसाठी देशासाठी संरक्षणासाठी निरपराध सैनिकांचा मृत्यू होणे आणि त्याचे राजकरण करून देशाची निवडणूक जिंकणे याचा प्रयत्न झाला आहे. या विश्वासघातकी व्यवस्थेबाबत पंतप्रधान मोदी यांनी उत्तर द्यावे. देशातील जनतेतच्या मनात एक मोठा संशय मोदी सरकारबाबत निर्माण झाला आहे. भाजपचे संघटन महासचिव राम माधव यांनी जम्मू काश्मिरच्या सुरक्षेसाठी जे काही पैसे दिले जातात, त्या फाईलवर सही सही करण्यासाठी आपल्याला ३०० कोटींची ऑफर दिली होती, असा गौप्यस्फोटही मलिक यांनी केली आहे. यावरून सुरक्षेतही भाजप किती मोठा भ्रष्टाचार करीत आहे हे देखील स्पष्ट झाले आहे. या दोन्ही मुद्यांवर पंतप्रधान मोदी यांना उत्तर द्यावे लागेल, अशी मागणी पटोले यांनी केली.

सरकारवर देशद्रोहाचा खटला चालवा - राऊत 

हा मोठा गौप्यस्फोट नाही, ही गोष्ट देशाला आधीच माहीत होते. त्यावेळचे सत्ताधारी यांना निवडणुका जिंकण्यासाठी काहितरी गडबड करतील हे माहीत होतं. हे प्रश्न आम्ही वारंवार विचारण्याचा प्रयत्न केला. १५० किलो आरडीएक्स त्याठिकाणी गेले, आरडीएक्स पोहचले कसे, पुलवामा रस्त्यावर जवान का पाठवले, त्यांच्यासाठी विमान का पाठवले नाही, की जवानांची हत्या व्हावी आणि निवडणुका जिंकायच्या असा आरोप केल्यावर आमच्यावर देशद्रोहाचा आरोप झाला. मात्र आज सत्यपाल मलिक यांनी थेट सत्य मांडले. या सरकारवर देशद्रोहाचा खटला चालविला पाहिजे, आणि जे दोषी आहे त्यांचे कोर्ट मार्शल व्हायला पाहिजे. राजकीय लाभ घेण्यासाठी या हत्येचा फायदा केला गेला, याची चौकशी व्हावी खा. संजय राऊत यांनी नागपुरात केली.

टॅग्स :PoliticsराजकारणNana Patoleनाना पटोलेSanjay Rautसंजय राऊतNarendra Modiनरेंद्र मोदीpulwama attackपुलवामा दहशतवादी हल्ला