शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
5
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
6
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
7
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
8
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
9
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
10
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
11
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
12
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
13
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
14
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
15
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
16
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
17
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
18
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
19
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
20
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा

भारताला जगात अव्वल बनवणं हाच PM मोदींचा संकल्प, १३० कोटी जनतेनं एक पाऊल पुढे टाकावं; अमित शाह यांची साद

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2023 14:00 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संकल्प केला आहे की २०४७ पर्यंत भारत जगातं नेतृत्व करताना दिसेल.

नागपूर-

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संकल्प केला आहे की २०४७ पर्यंत भारत जगातं नेतृत्व करताना दिसेल. यासाठी देशातील प्रत्येक नागरिकानं एक पाऊल पुढे टाकलं तरी देश १३० कोटी पावलं पुढे जाऊ शकतो इतकी आपल्या देशाची ताकद आहे, असं केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह म्हणाले. ते नागपूर लोकमतच्या सुवर्ण महोत्सव आणि जवाहरलाल दर्डा जन्मशताब्दी वर्ष सोहळ्यात बोलत होते. 

"आज राजकारणात एकमेकांचे शत्रू असल्यासारखं वागतात, पण.."; फडणवीसांचं महत्वाचं विधान!

अमित शाह यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात देशात झालेल्या बदलांची आणि घेतल्या गेलेल्या कटू निर्णयांमुळे देशाला मिळालेली नवी दिशा याबाबत माहिती दिली. "भारत आज वेगानं पुढे जात आहे. मला विश्वास आहे की पंतप्रधान मोदींनी जो संकल्प केला आहे की २०४७ साली भारत जगात अव्वल झाला पाहिजे. कदाचित त्यावेळी आपल्यापैकी अनेकजण नसतीलही. पण मी इतकं विश्वासानं सांगू शकतो की २०४७ मधील युवा जगातील अव्वल भारताचं प्रतिनिधीत्व करणारा असेल. जर १३० कोटी जनता तर पाऊल पुढे आली तर संपूर्ण देश १३० पावलं पुढे जातो ही आपली ताकद आहे", असं अमित शाह म्हणाले. 

भारताला जगात अव्वल बनवणं हेच लक्ष्यभारत जगात सर्वप्रथम झाला पाहिजे हेच लक्ष्य घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी काम करत आहेत, असं अमित शाह म्हणाले. "स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव सध्या सुरू आहे आणि यात आज आपण पुढे गेलो आहोत. आम्ही कधीच मतांचं राजकारण केलं नाही. मोदीजी सत्तेत येण्याआधी देशात अंतर्गत सुरक्षेबाबतचे तीन मोठे हॉटस्पॉट होते. जम्मू-काश्मीर, नॉर्थ-इस्ट आणि नक्षलवाद्यांचा प्रभाव असलेला भाग जो महाराष्ट्र, विदर्भाच्या सीमेतही आहे. मी आज दाव्यानं सांगू शकतो की या तिन्ही क्षेत्रात हिंसाचाराच्या घटनांमध्ये ८० टक्के घट करण्याचं काम मोदींच्या नेतृत्त्वात झालं आहे. कलम ३७० हटवलं तेव्हा संसदेत भाषणं ठोकली गेली काश्मीरात रक्ताचे पाट वाहतील. रक्ताचे पाट सोडा साधे लहान दगड देखील कुणी मारू शकलं नाही. दगडफेक व्हायची, हिंसाचार व्हायचा आता सगळं बंद झालं. आता काश्मीरात थिएटर चालतात, गुण्यागोविंदानं सर्व राहतात आणि १ कोटी ८० लाख पर्यटकांनी काश्मीला एका वर्षात भेट दिली आहे. गेल्या ७० वर्षात काश्मीरमध्ये १२ हजार कोटींची गुणवणूक आली. पण गेल्या ८ वर्षात आम्ही १२ हजार कोटी काश्मीरमध्ये गुंतवणूक आणली", असं अमित शाह म्हणाले.  

टॅग्स :Amit Shahअमित शाह