दपूमरेत चाबीदारांना पदावनत करण्याचा कट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:09 IST2021-02-16T04:09:10+5:302021-02-16T04:09:10+5:30

नागपूर : दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात गँगमन पदावर कार्यरत १८ ते २० कर्मचाऱ्यांना अचानक चाबीदार पदावर बढती ...

The plot to demote the key holders at noon | दपूमरेत चाबीदारांना पदावनत करण्याचा कट

दपूमरेत चाबीदारांना पदावनत करण्याचा कट

नागपूर : दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात गँगमन पदावर कार्यरत १८ ते २० कर्मचाऱ्यांना अचानक चाबीदार पदावर बढती देण्यात आली. सहा वर्षे त्यांनी जुन्याच ग्रेड पेनुसार काम केले. आता मात्र त्यांना पदावनत करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या अन्यायग्रस्त कर्मचाऱ्यांनी पत्रकार परिषदेत आपली व्यथा मांडली. सत्तारूढ कामगार संघटनेच्या दबावाखाली हा अन्याय करण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केला.

२०१४ पर्यंत चाबीदार पदावर पदोन्नती मिळालेल्या कर्मचाऱ्यांना २४००-२८०० ग्रेड-पेनुसार वेतन दिले जात आहे. त्याच धर्तीवर २०१५ मध्येही पूर्वसंमती घेऊन गँगमन पदावर कार्यरत १८ ते २० जणांना चाबीदार पदावर पदोन्नती दिली गेली. वाढीव ग्रेड-पे मात्र दिला गेला नाही. परिस्थिती पालटेल या अपेक्षेने ते कार्यरत आहेत. सहा वर्षांनंतर मात्र त्यांना पुन्हा गँगमन पदावर पदावनत करण्याची प्रक्रिया आरंभण्यात आली. याविरोधात कर्मचाऱ्यांनी कॅटमध्येही धाव घेतली. परंतु, कॅटच्या निर्णयाची वाट न बघता पुढील कारवाई प्रशासनाने आरंभली आहे. दक्षिण पूर्व मध्य रेल्वेतील मान्यताप्राप्त रेल्वे कामगार काँग्रेसने त्यांच्या मर्जीतील लोकांना पदोन्नतीचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रशासनावर दबाव निर्माण केला आहे. दबावाला बळी पडून प्रशासनाकडून अन्यायकारक कारवाई केली जात असल्याचा अन्यायग्रस्त कामगारांचा आरोप आहे. कारवाई नियमाच्या टप्प्यात आणण्यासाठी प्रभारी चाबीदार असे दर्शविण्यात आले. नियुक्तीपत्रात मात्र तसा कोणताही उल्लेख नाही. अधिकाऱ्यांपर्यंत अन्याय मांडला. पण, कुणीही लक्ष देण्यास तयार नाही. अन्याय दूर करून २४००-२८०० ग्रेड-पेनुसार वेतन द्यावे. कॅटच्या निर्णयापर्यंत पदावनत करण्याची प्रक्रिया थांबविण्यात यावी, अशी या कामगारांची मागणी आहे. पत्रकार परिषदेला दिलीप डोंगरे, अमर तामगाडगे, विजय मुदलियार उपस्थित होते.

..........

Web Title: The plot to demote the key holders at noon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.