जड वाहतुकीमुळे वारेगाव-खैरी रस्त्याची दुर्दशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:08 IST2021-06-02T04:08:29+5:302021-06-02T04:08:29+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क कामठी : वारेगाव ते खैरी या मार्गाचे मागील वर्षी खडीकरण व डांबरीकरण करण्यात आले. परंतु या ...

जड वाहतुकीमुळे वारेगाव-खैरी रस्त्याची दुर्दशा
लाेकमत न्यूज नेटवर्क
कामठी : वारेगाव ते खैरी या मार्गाचे मागील वर्षी खडीकरण व डांबरीकरण करण्यात आले. परंतु या मार्गाने दरराेज हाेणाऱ्या जड वाहतुकीमुळे रस्त्याची दुर्दशा झाली आहे. त्यामुळे या मार्गाची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, या मागणीसाठी खैरी येथील सरपंच माेरेश्वर कापसे यांच्यासह ग्रामस्थांनी मंगळवारी (दि.१) रास्ता राेकाे आंदाेलन केले.
२०१९-२० या वर्षात मुख्यमंत्री ग्रामसडक याेजनेंतर्गत वारेगाव-खैरी मार्गाचे खडीकरण व डांबरीकरण झाले. काेराडी मंदिरात दर्शनाला जाणारे भाविक तसेच वारेगाव, बिना, खापरखेडा येथील नागरिक नागपूर येथे ये-जा करण्यासाठी याच मार्गाचा वापर करतात. हा मार्ग सर्वांसाठी साेयीचा असल्याने मार्गावर सतत वर्दळ सुरू असते. या मार्गालगत खापरखेडा वीज केंद्राच्या राख निस्तारण केंद्राचा तलाव असून, या ठिकाणी राखेचा उपसा करून ट्रकद्वारे इतरत्र वाहतूक केली जाते. गेल्या सहा महिन्यांपासून माेठ्या प्रमाणात राखेची जड वाहतूक केली जात आहे. परिणामी, या मार्गावर जागाेजागी खड्डे पडले आहेत. अनेकदा खड्ड्यात पडून अपघातसुद्धा घडतात. दुसरीकडे ही राख वाहतूक करताना कुठलीही खबरदारी घेतली जात नाही. ट्रकवर कापड वा ताडपत्री झाकली जात नसल्याने परिसरात सर्वत्र राखेचे लाेळ पसरतात. यामुळे खैरी, खसाळा, मसाळा, कवठा, सुरादेवी, वारेगाव गाव परिसरात माेठ्या प्रमाणात प्रदूषण वाढले असून, गावकरी हैराण झाले आहे.
या मार्गाच्या दैनावस्थेबाबत सरपंच माेरेश्वर कापसे यांनी अनेकदा खापरखेडा व काेराडी वीज केंद्राकडे रीतसर तक्रारी केल्या. मात्र त्याची कुणीही दखल घेतली नसल्याने अखेर मंगळवारी गावकऱ्यांनी रास्ता राेकाे करीत रस्त्याच्या समस्येकडे लक्ष वेधले. रास्ता राेकाे आंदाेलनामुळे या मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली हाेती. दरम्यान, आंदाेलनाची माहिती मिळताच मुख्य अभियंता एस. ठाकरे यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली व या मार्गाची दुरुस्ती करण्याचे आश्वासन दिले. या मार्गाने हाेणारी राखेची जड वाहतूक बंद करण्याची मागणी सरपंच माेरेश्वर कापसे यांनी यावेळी केली. अन्यथा पुन्हा आंदाेलन करू, असा इशाराही त्यांनी दिला. यावेळी ग्रा.पं. सदस्य दिलीप ठाकरे, हृदय सोनवणे, दिनेश मानकर, विजया शेंडे, प्रीती मानकर, सुजाता डोंगरे, छाया कानफाडे, मुरली तळेकर आदींसह ग्रामस्थ उपस्थित हाेते.
===Photopath===
010621\img-20210531-wa0144.jpg
===Caption===
सरपंच मोरेसर कापसे सह मुख्य अभियंता एस ठाकरे व सहकारी रोडची पाहणी करताना