‘ओव्हरब्रिज’च्या कामात कामगारांच्या जीवाशी खेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:09 IST2021-01-03T04:09:56+5:302021-01-03T04:09:56+5:30

मंगेश तलमले लाेकमत न्यूज नेटवर्क खात : रामटेक - भंडारा मार्गावरील खात (ता. माैदा) येथील रेल्वे फाटकाजवळ ‘ओव्हरब्रिज’च्या निर्मितीचे ...

Playing with the souls of the workers in the work of ‘Overbridge’ | ‘ओव्हरब्रिज’च्या कामात कामगारांच्या जीवाशी खेळ

‘ओव्हरब्रिज’च्या कामात कामगारांच्या जीवाशी खेळ

मंगेश तलमले

लाेकमत न्यूज नेटवर्क

खात : रामटेक - भंडारा मार्गावरील खात (ता. माैदा) येथील रेल्वे फाटकाजवळ ‘ओव्हरब्रिज’च्या निर्मितीचे काम सुरू आहे. या ठिकाणी कंत्राटदार कंपनीने काेणत्याही सुरक्षात्मक उपाययाेजना केल्या नाहीत. शिवाय, निर्माणाधीन पुलाखालून रहदारी सुरू आहे. कंत्राटदार कंपनीचा हा हलगर्जीपणा कामगारांसह नागरिकांच्या जीवाशी खेळणारा आहे, अशा प्रतिक्रिया खात येथील नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत.

सध्या या ‘ओव्हरब्रिज’च्या दाेन काॅलमवर स्लॅब टाकण्याचे, तर दाेन काॅलमला सळाकी लावण्याचे काम सुरू आहे. याच ठिकाणी वेल्डिंगचेही काम सुरू आहे. त्यासाठी कामगारांची नियुक्ती केली आहे. ही कामे करतेवेळी कामगारांच्या जीविताच्या दृष्टीने दाेन काॅलमच्या मध्ये जाळ्या लावणे व इतर सुरक्षात्मक उपययाेजना करणे गरजेचे आहे. मात्र, कंत्राटदार कंपनीने या उपाययाेजनांना फाटा दिला आहे. वेल्डिंगच्या ठिणग्या सतत खाली पडत असतानाच निर्माणाधीन पुलाखालून नागरिकांची ये-जा सुरू असते. त्या ठिणग्या नागरिकांच्या अंगावर तसेच वाहनांवर पडत असतात. त्यातून माेठा अपघात हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही.

या पुलाच्या एका बाजूला सिमेंट काँक्रीटचे काम सुरू असून, जवळच सिमेंटचा मसाला ठेवला आहे. काही काॅलमवर पाणी टाकण्याचे काम सुरू आहे. ते पाणी रात्रंदिवस झिरपत असते. त्यामुळे ये-जा करणाऱ्या नागरिकांचे कपडेही खराब हाेतात. दुसरीकडे, जमीन सतत ओली राहात असल्याने तसेच नागरिकांचे लक्ष वर जात असल्याने दुचाकी वाहने स्लीप हाेऊन अपघातही वाढले आहेत. कंत्राटदार कंपनीच्या या मनमानी कारभाराला ब्रेक लावण्यास कुणीही तयार नाही.

.....

कामगार जखमी

सुरक्षात्मक उपाययाेजना केल्या नसल्याने एक कामगार काम करीत असताना पडला आणि जखमी झाला हाेता. याच ठिकाणाहून वाहनांची वर्दळ असते. वाहने रात्रीच्यावेळी काॅलमच्या सळाकींना धडकून अपघात किंवा वाहनचालकांवर काॅलमचे सेट्रिंग काेसळून त्यात कुणी जखमी हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासंदर्भात माहिती घेण्यासाठी कंत्राटदार कंपनीचे अभियंता विकास व्यास यांच्याशी चर्चा केली असता, त्यांनी ‘तुम्हारे गाववालाें के हिसाब से काम करे क्या’ असे उलट उत्तर दिले. त्यामुळे कंपनीचे मालक अमित यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला. परंतु, त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

Web Title: Playing with the souls of the workers in the work of ‘Overbridge’

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.