शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
5
चोरीच्या आरोपाखाली महिलेला दिली थर्ड डिग्री, पोलिसांवर गुन्हा दाखल 
6
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
7
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
8
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
9
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
10
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
11
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
12
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
13
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
14
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
17
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
18
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार

सावल्यांच्या खेळातून उलगडल्या वेदना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2018 12:40 AM

परदेशी राहणाऱ्या मुलांना भेटायला आतूर झालेल्या म्हाताऱ्या आईवडिलांची व्यथा, आमटीत पडलेल्या ओल्या सुंभासारखे, घुमसणारे हे असुखी-निसुखी जीव, उजेडाला दीपणारे पण अंधाराला ओळखी सांगणारे, मुलांच्या भेटीकरिता व्याकूळ असलेली आई सुलोचना आणि वास्तव्याचे भान असलेले वडील विनायक यांच्या आयुष्यातील या कृष्णधवल सावल्या अन् या सावल्यांमधून अभिव्यक्त होणाऱ्या वेदना नागपूरकर प्रेक्षकांनी अनुभवल्या. निमित्त होते महावितरणच्या आंतरपरिमंडलीय नाट्य स्पर्धेचे.

ठळक मुद्देदोन दिवसीय आयोजन : महावितरणच्या नाट्य स्पर्धेचे शानदार उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्क 

नागपूर : परदेशी राहणाऱ्या मुलांना भेटायला आतूर झालेल्या म्हाताऱ्या आईवडिलांची व्यथा, आमटीत पडलेल्या ओल्या सुंभासारखे, घुमसणारे हे असुखी-निसुखी जीव, उजेडाला दीपणारे पण अंधाराला ओळखी सांगणारे, मुलांच्या भेटीकरिता व्याकूळ असलेली आई सुलोचना आणि वास्तव्याचे भान असलेले वडील विनायक यांच्या आयुष्यातील या कृष्णधवल सावल्या अन् या सावल्यांमधून अभिव्यक्त होणाऱ्या वेदना नागपूरकर प्रेक्षकांनी अनुभवल्या. निमित्त होते महावितरणच्या आंतरपरिमंडलीय नाट्य स्पर्धेचे. सोमवारी सायंटिफिक सभागृहात प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने या स्पर्धेचा प्रारंभ झाला. यावेळी महावितरणचे मुख्य अभियंते रफीक शेख, सुहास रंगारी, दिलीप घुगल, अरविंद भादीकर तसेच परीक्षक मधू जोशी, शोभना मोहरील, किशोर डाऊ यांच्यासोबतच महाव्यवस्थापक (वित्त व लेखा) शरद दाहेदार, अधीक्षक अभियंते हरीश गजबे, सम्राट वाघमारे, उमेश शहारे, सुनील देशपांडे, दिलीप दोडके, मनीष वाठ, नारायण आमझरे, सुहास मेत्रे उपस्थित होते. उद्घाटनानंतर अमरावती परिमंडलाने ‘काही सावल्यांचे खेळ’ हे नाटक सादर केले. लेखक प्रसन्न शेंबेकर, दिग्दर्शक हेमराज ढोके होते. अभिजित सदावर्ती, वैशाली ठाकरे, विकास बांबल यांनी यात प्रमुख भूमिका साकारल्या. दुपारच्या सत्रात चंद्रपूर परिमंडलाने ‘अधांतर’ तर सायंकाळी अकोला परिमंडलाने ‘एक क्षण आयुष्याचा’ नाटक सादर केले. ‘अधांतर’ या नाटकात ८० च्या दशकातील मुंबईतील विस्कळीत जीवनाचे चित्र रंगविण्यात आले. या नाटकाचे लेखक जयंत पवार असून पंकज होनाडे यांनी दिग्दर्शन केले. स्नेहांजली तुंबडे, माधुरी सोनावणे, रोहिणी ठाकरे, शशांक डगवार. कृपाल लांजे, विवेक माटे, भालचंद्र घोडमारे, रवींद्र राऊन, नितीन पिंपळकर यांनी यात भूमिका साकारल्या. ‘एक क्षण आयुष्याचा’ या नाटकाने आजच्या भ्रष्टाचाराने पोखरून टाकलेल्या यंत्रणेविरुद्ध एल्गार पुकारला. चंद्रकांत शिंदे लिखित आणि नितीन नांदूरकर दिग्दर्शित या हृदयस्पर्शी नाट्याविष्काराचे सूत्रधार अरविंद भादीकर तर निर्मिती गुलाबराव कडाळे यांची होती.उद्घाटनीय कार्यक्रमाचे प्रास्ताविक मेघा अमृते, संचालन आणि आभार मधुसूदन मराठे यांनी मानले.

टॅग्स :cultureसांस्कृतिकnagpurनागपूर