खेळाचे मैदान झाले कुरण!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:09 IST2021-07-31T04:09:25+5:302021-07-31T04:09:25+5:30
सध्या टोकियो ऑलिम्पिकचे वारे सुरू आहेत. सध्या तरी भारोत्तोलनमध्ये मीराबाई चानू हिनेच भारतासाठी रौप्य पदकाची कमाई केली. आणखी पदकांची ...

खेळाचे मैदान झाले कुरण!
सध्या टोकियो ऑलिम्पिकचे वारे सुरू आहेत. सध्या तरी भारोत्तोलनमध्ये मीराबाई चानू हिनेच भारतासाठी रौप्य पदकाची कमाई केली. आणखी पदकांची अपेक्षा आहे. या पार्श्वभूमीवर नागपुरातील क्रीडांगणांची दैनावस्था बघता आणि खेळाडू मैदानावरून अदृष्य झालेले असता क्रीडा स्पर्धांतून पदकांची अपेक्षा योग्य आहे का, हा प्रश्न पडतो. कोरोना संक्रमणामुळे शासकीय निर्बंध कठोर आहेत आणि त्यामुळे, खेळाडूंची मैदानांवरील कसरत बंद आहे. सद्यस्थिती बघता, ही बाब एकदा समजून घेण्यासारखी आहे. मात्र, त्यामुळे क्रीडांगणांची निगा राखण्याचे कर्तव्य संपले का, असा सवाल उपस्थित होतो. शहरातील क्रीडांगणे झाडे-झुडपे-गवताच्या सावटाखाली आली आहेत. तेथे खेळाडू नसल्याने गुरे चरत आहेत. जेव्हा निर्बंध उठवले जातील, तेव्हा खेळाडूंनी या गवतांमध्येच कसरत करावी का? निर्बंध उठल्यावर गवत कापण्याची प्रतीक्षाच खेळाडूंनी करावी का? असे अनेक प्रश्न उपस्थित होण्यासारखे आहेत. खेळाच्या मैदानाची ही कुरणावस्था सदर येथील विदर्भ महिला हॉकी असोसिएशननेच टायगर गॅप मैदान, पोलीस लाईन टाकळी येथील पोलीस मुख्यालयाचे फुटबॉल ग्राऊंड, सक्करदरा येथील श्रीमती बिंझाणी महिला क्रीडांगण, क्रीडा चौकातील ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाचे मैदान, रेशीमबाग मैदानाची आहे.
छायाचित्र - राजेश टिकले
..................