शहरं
Join us  
Trending Stories
1
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
2
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
3
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
4
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
5
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
6
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
7
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
8
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
9
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
10
"सगळे या..सगळे या...", मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
11
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
12
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
13
लेख: आता सीरियाचं 'लक्ष' महिलांच्या कपड्यांवर
14
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
15
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
16
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
17
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
18
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
19
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
20
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!

प्लास्टो नागपूर महामॅरेथॉनचे किट वितरण : 'बिब कलेक्शन एक्स्पो'ला उत्स्फूर्त प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2020 23:55 IST

आर सी प्लास्टो टँक अ‍ॅन्ड पाईप्स प्रायोजित तसेच नागपूर महामेट्रोद्वारा सहपुरस्कृत लोकमत नागपूर महामॅरेथॉनच्या तिसऱ्या पर्वात १० हजारावर धावपटूंसह सर्वसामान्य नागपूरकर आणि राज्यातील धावपटू सहभागी झाले आहेत.

ठळक मुद्देआरोग्य तपासणी, आहारावर तज्ज्ञांनी केले मार्गदर्शन; संगीताचीही मेजवानी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आर सी प्लास्टो टँक अ‍ॅन्ड पाईप्स प्रायोजित तसेच नागपूर महामेट्रोद्वारा सहपुरस्कृत लोकमत नागपूर महामॅरेथॉनच्या तिसऱ्या पर्वात १० हजारावर धावपटूंसह सर्वसामान्य नागपूरकर आणि राज्यातील धावपटू सहभागी झाले आहेत.

सर्व धावपटूंसाठी बिब कलेक्शन तसेच मार्गदर्शन एक्स्पोचे शनिवारी रामगोपाल माहेश्वरी सभागृह (हिंदी मोरभवन) झाशी राणी चौक सीताबर्डी येथे आयोजन करण्यात आले होते.
सकाळी १० ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत चाललेल्या बिब वितरण कार्यक्रमात धावपटूंना किट देण्यात आली. याशिवाय आरोग्य तपासणी, व्यायाम, आहार, आदींविषयी तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले; सोबतीला रॉक बँड संगीत सादर करण्यात आले.
‘एक्स्पो’चे उद्घाटन महामॅरेथॉनचे ब्रीद असलेलेल्या ‘क्रॉस द लाईन’ रेषा क्रॉस करीत फित कापून आणि तसेच हवेत फुगे सोडून झाले. जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त चिन्मय पंडित, लोकमत महामॅरेथॉनच्या संस्थापिका रुचिरा दर्डा, महामॅरेथॉनचे रेस डायरेक्टर संजय पाटील, प्लास्टो टँक अ‍ॅन्ड पाईप्सचे संचालक विशाल अग्रवाल आणि वैभव अग्रवाल, महामेट्रोचे कार्यकारी संचालक अनिल कोकाटे, एलेक्सिस हॉस्पिटलचे सिनियर प्रशासक डॉ. तुषार गावड, कोटक महिंद्रा बँकेचे रिजनल सेल्स मॅनेजर अभिजितसिंग राठोर, प्रोझोन पाम्सतर्फे मिस मीनल, सेंट पॉल स्कूलचे संचालक राजाभाऊ टाकसाळे, ट्रीट आईस्क्रीमचे संचालक अमोल चकनलवार, विवांते अल्कलाईन वॉटरचे संचालक पृथ्वीराज जगताप आदी मान्यवरांची व्यासपीठावर उपस्थिती होती. सर्व पाहुण्यांनी महामॅरेथॉनचे टी-शर्ट आणि गुडी बॅकचे लोकार्पण केले.
जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी आयोजनाला शुभेच्छा देत महामॅरेथॉनचे आयोजन फिट इंडिया मुव्हमेंटला योगदान देणारे ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.वाहतूक शाखेचे उपायुक्त चिन्मय पंडित यांनी पाणी वाचवण्याचा संदेश देण्याचे काम धावपटूंनी करावे. शिवाय देशात वर्षभरात अपघातामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या दोन लाख इतकी असल्याने वाहतुकीचे नियम पाळण्याचे उपस्थितांना आवाहन केले.

टॅग्स :MarathonमॅरेथॉनLokmat Eventलोकमत इव्हेंट