पत्नी उषाने लावलेले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 04:27 IST2020-12-16T04:27:29+5:302020-12-16T04:27:29+5:30

नागपूर : आईवडिलांना सोडून वेगळे राहणे मला मान्य नाही. पण पत्नी उषा हिने लग्नाच्या काही दिवसानंतर वेगळे होण्याचा आग्रह ...

Planted by wife Usha | पत्नी उषाने लावलेले

पत्नी उषाने लावलेले

नागपूर : आईवडिलांना सोडून वेगळे राहणे मला मान्य नाही. पण पत्नी उषा हिने लग्नाच्या काही दिवसानंतर वेगळे होण्याचा आग्रह माझ्याकडे धरला. याला माझा विरोध होता. ते मान्य न केल्याने उषाने माझ्याविरोधात पोलिसात तक्रार केली असल्याचा आरोप सतीश उपासराव तुळसकर यांनी केला आहे. पती सतीश तुळसकर आणि त्यांचे आईवडील त्रास देत असल्याची तक्रार उषा यांनी उमरेड पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. यावर सतीश यांनी लोकमतकडे आपली भूमिका मांडली.

लग्नानंतर सतत तीन महिने उषा हिने माझ्यामागे वेगळे होण्यावरून तगादा लावला. मला रात्री अपरात्री केव्हाही झोपेतून उठवून वेगळे होण्याबद्दल ती त्रास द्यायची. तुम्ही वेगळे होणार नसाल तर माझ्या माहेरच्या लोकांना सांगून हुंडा मागणीची खोटी तक्रार द्यायला लावेल अशी धमकीही द्यायची असे सतीश यांनी सांगितले आहे. पोलीस तपासात या प्रकरणातील वस्तुस्थिती समजेल असेही ते म्हणाले.

Web Title: Planted by wife Usha