शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम दहशतवादी हल्ला: पाकिस्तानी उच्चायोगाने केक मागविला; कशासाठी?
2
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
3
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
4
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
5
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
6
Pahalgam Attack Video: दहशतवाद्यांनी पर्यटकांची अशी केली हत्या; गोळ्या झाडतानाचा व्हिडीओ समोर
7
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
8
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
9
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
10
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
11
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
12
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २६ एप्रिलपासून 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद
14
मित्राकडून महागडं गिफ्ट घेतलं तर द्यावा लागू शकतो Tax! ९०% लोकांना Gift वरील टॅक्सचा नियमच माहीत नाही
15
मनिषाचा तो एक ईमेल ज्यामुळे डॉक्टर झाले व्यथित; 'त्या' मेलमध्ये दडलंय काय? झालं उघड
16
हृदयद्रावक! बुलेट चालवताना २० वर्षीय तरुणाला आला हार्ट अटॅक; वेदनेने तडफडत असतानाच...
17
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
18
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
19
भरमैदानात हार्दिक पांड्यानं जयवर्धनेशी घातला वाद? दोघांमधील संभाषण कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ
20
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?

नागपुरातील आऊटर रिंग रोडचा प्लॅन बदलला ; शेतकऱ्यांना पुन्हा बसणार फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 14:21 IST

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचए) रिंगरोडच्या नकाशात बदल करून रस्ता सुमारे ५०० फूट सरकवण्यात आला व पुन्हा शेतकऱ्यांच्या जमिनी घेण्यासाठी भूसंपादनाची नोटीस बजावण्यात आली आहे.

ठळक मुद्देमाहुरझरी, भरतवाडाच्या शेतकऱ्यांचा जमिनी देण्यास तीव्र विरोध२००६ मध्ये केले भूसंपादन, आता पुन्हा दिली नोटीसएकाच शेतातून दोनदा रस्त्यासाठी घेताहेत जमीन

कमलेश वानखेडे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आऊटर रिंग रोडसाठी २००६ मध्ये माहुरझरी,भरतवाडा येथील शेत जमिनी अधिग्रहित करण्यात आल्या. त्याचे अवॉर्ड करून शेतकऱ्यांना मोबदलाही देण्यात आला. मात्र, त्या जागेवर रिंग रोड बांधण्यातच आला नाही. आता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचए) रिंगरोडच्या नकाशात बदल करून रस्ता सुमारे ५०० फूट सरकवण्यात आला व पुन्हा शेतकऱ्यांच्या जमिनी घेण्यासाठी भूसंपादनाची नोटीस बजावण्यात आली. काही शेतकऱ्यांच्या शेतातून तर जुना व नवा असे दोन्ही रस्ते टाकण्यात आले. त्यामुळे शेतकऱ्यांनी आता आपल्या जमिनी देण्यास स्पष्ट नकार दिला आहे. सरकारने बळजबरीने जमिनी घेतल्या तर विधानभवनासमोर आत्मदहन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.एकाच शेतातून रस्त्यांसाठी दोनदा भूसंपादनमौजा भरतवाडा येथील प.ह.नं. १२ मधील खसरा क्रमांक ९(अ), ९(ब-२), ९ (ब३) व ९ (ब४) ही शेतजमीन उषाबाई राऊत, प्रवीण राऊत, प्रमोद राऊत यांच्या मालकीची आहे. २००६ मध्ये रिंग रोडसाठी या शेतजमिनीपैकी १.३१ हेक्टर जमीन अधिग्रहित करण्यात आली होती. त्यावेळी या शेतीचे दोन तुकडे पडले होते. या संपादित जमिनीवर अद्याप रिंगरोड झालेला नाही. असे असताना आता त्याच शेतीच्या दुसऱ्या टोकावरील जमीन नव्याने रिंग रोडसाठी पुन्हा अधिग्रहित करण्यात येत आहे. त्यामुळे राऊत यांच्या शेताचे तीन तुकडे पडले आहेत. एकाच शेतजमिनीतून दोनदा रस्त्यांसाठी जमीन घेऊन सरकार शेतकऱ्याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करीत आहे का, असा सवाल राऊत यांनी केला आहे.ओलिताची जमीन संत्रा, आंब्याचे नुकसानरिंग रोडसाठी २००६ मध्ये भूसंपादन झाल्यानंतर शेतकऱ्यांनी तेवढी शेतजमीन सोडून उर्वरित जागेवर संत्रा झाडांची लागवड केली. आता एनएचएने नकाशात बदल करीत रस्ता दुसरीकडून वळविल्यामुळे मोठ्या प्रमाणात संत्रा बगिच्याची व ओलित जमीन संपादित केली जात आहे. काही शेतकऱ्यांची आंब्याची झाडेही या अधिग्रहणात येत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. यामुळे एकदा जमीन दिल्यानंतर आता पुन्हा दुसऱ्यांदा जमीन देणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. आऊटर रिंग रोडसाठी २००६ मध्ये नागपूर ग्रामीण तालुक्यातील भूसंपादन करण्यात आले. त्या वेळी मौजा माहुरझरी येथील २२ खसऱ्यांचा भूसंपादनात समावेश होता. तर मौजा भरतवाडा येथील याहून अधिक खसरे समाविष्ट होते. सुरुवातीला ६० मीटर रुंदीच्या रस्त्यासाठी हे भूसंपादन करण्यात येत असल्याचे शेतकऱ्यांना सांगण्यात आले होते. या वेळी शेतकऱ्यांनी संबंधित रस्त्याला विरोध केला नाही. विकासात सहकार्य केले. जिल्हाधिकाऱ्यांमार्फत जमिनींची मोजणी करण्यात आली व शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदलाही देण्यात आला. त्या वेळीही नकाशावर केलेले भूसंपादन व प्रत्यक्षात ताब्यात घेतलेल्या जमिनी यात तफावत होती. एनएचएने या मोजणीनुसार मार्किंग केले असता संबंधित रस्ता भरतवाडा रेल्वे स्टेशनमधून जात असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.यानंतर एनएचएने माहुरझरी व भरतवाडा दरम्यानच्या रिंग रोडच्या नकाशात बदल केला. आधी अधिग्रहित केलेल्या जमिनीपासून सुमारे २०० ते ५०० फूट रस्ता पश्चिमेस सरकवून नव्याने मार्किंग करून नकाशा तयार करण्यात आला. एनएचएने ३० मे २०१६ रोजी या नव्या नकाशानुसार माहुरझरी व भरतवाडा येथील शेतजमिनीचे पुन्हा भूसंपादन करण्यासाठी अधिसूचना जारी केली. या अधिसूचनेमुळे शेतकऱ्यांना धक्का बसला. रिंग रोडसाठी एकदा जमीन दिली असताना आता पुन्हा जमिनी कशी द्यायची असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला. शेतकऱ्यांनी एनएचएकडे आक्षेप नोंदविले. जमिनी देण्यास नकार दर्शविला. एनएचएने सुनावणी घेण्याचे सोपस्कार पार पाडले व १० जून २०१७ रोजी पेपर पब्लिकेशन जारी करीत सर्व आक्षेप फेटाळल्याचे सांगत संबंधित शेत जमिनींचे अधिग्रहण करण्यात येत असल्याचे जाहीर केले. एनएचएच्या या भूमिकेमुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र रोष पसरला आहे.

भरतवाडा येथील घरांना फटकारिंग रोडच्या जुन्या नकाशानुसार भरतवाडा गावाला कुठल्याही प्रकारचे नकसान होत नव्हते. मात्र, नकाशात बदल करून आता रस्ताच बदलण्यात आल्यामुळे भरतवाडा गावातील घरांना फटका बसत आहे. नव्या नकाशानुसार रस्ता झाला तर काही घरे तोडावी लागणार आहेत. गावाठाणाची जमीनही जाणार आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा