पु.ल. देशपांडे जन्मशताब्दी : स्टॅण्डअप कॉमेडी स्पर्धेकडे स्पर्धकांची पाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 23:57 IST2019-07-30T23:56:49+5:302019-07-30T23:57:38+5:30
ज्यांच्या विनोदी आणि सारगर्भित लेखनाची आजन्म भुरळ पडावी अशा लाडक्या आणि महाराष्ट्राला पडलेले गोड स्वप्न म्हणून गौरविल्या गेलेल्या पु.ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त राज्याच्या सांस्कृतिक संचालनालयाच्यावतीने आयोजित ‘स्टॅण्डअप कॉमेडी’ या एकपात्री स्पर्धेच्या प्राथमिक फेरीकडे नागपुरातील स्पर्धकांनी पाठच फिरवली, असे म्हणावे लागेल. दीक्षाभूमी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्या सभागृहात मंगळवारी पार पडलेल्या या स्पर्धेत कसेबसे ११ स्पर्धक सहभागी झाले होते.

स्पर्धेत प्रथम क्रमांक विजेती शिल्पा शाहीर व द्वितीय क्रमांक विजेता निशांत अजबेले यांच्यासह ज्येष्ठ अभिनेते देवेंद्र दोडके, शशांक येवले, डॉ. सतीश पावडे, विलास गजघाटे व डॉ. आर. व्ही. पाटील
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ज्यांच्या विनोदी आणि सारगर्भित लेखनाची आजन्म भुरळ पडावी अशा लाडक्या आणि महाराष्ट्राला पडलेले गोड स्वप्न म्हणून गौरविल्या गेलेल्या पु.ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त राज्याच्या सांस्कृतिक संचालनालयाच्यावतीने आयोजित ‘स्टॅण्डअप कॉमेडी’ या एकपात्री स्पर्धेच्या प्राथमिक फेरीकडे नागपुरातील स्पर्धकांनी पाठच फिरवली, असे म्हणावे लागेल. दीक्षाभूमी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्या सभागृहात मंगळवारी पार पडलेल्या या स्पर्धेत कसेबसे ११ स्पर्धक सहभागी झाले होते.
विशेष म्हणजे, अमरावतीत पार पडलेल्या या स्पर्धेच्या प्राथमिक फेरिला २३ स्पर्धकांनी हजेरी लावली होती. नागपुरात चारच महिन्यापूर्वी ९९ वे अ.भा. मराठी नाट्यसंमेलन पार पडल्यानंतर, नागपूर-विदर्भातील नाट्यचळवळीला उभारी येईल अशी आशा निर्माण झाली होती. मात्र, तसे चित्र अद्यापतरी दिसत नाही. विशेष म्हणजे, या स्पर्धेची प्रसिद्धी शासनामार्फत गेल्या एक महिन्यापासून सर्वस्तरावर करण्यात आली. असे असतानाही, स्पर्धेकडे स्पर्धकांनी फिरवलेली पाठ अनेक शंका उपस्थित करणाऱ्या आहेत.