विद्यार्थ्याकडून पिस्तूल जप्त

By Admin | Updated: May 15, 2014 02:35 IST2014-05-15T02:18:30+5:302014-05-15T02:35:11+5:30

गुन्हे शाखेच्या पथकाने एका कुख्यात गुन्हेगाराला जेरबंद करून त्याच्याकडून माऊझर

Pistol seized from student | विद्यार्थ्याकडून पिस्तूल जप्त

विद्यार्थ्याकडून पिस्तूल जप्त

अनेक घरफोड्यात सहभाग विद्यार्थ्याकडून पिस्तूल जप्त

नागपूर :

गुन्हे शाखेच्या पथकाने एका कुख्यात गुन्हेगाराला जेरबंद करून त्याच्याकडून माऊझर (पिस्तूल) आणि चोरीच्या दोन मोटरसायकली जप्त केल्या. प्रशांत सुरेंद्र पारधी (वय २०) असे आरोपीचे नाव आहे. हा भामटा सीताबर्डीतील एका नामांकित महाविद्यालयात बीसीएचा विद्यार्थी आहे. त्याने नागपूर, भंडार्‍यासह मध्य प्रदेशातही चोर्‍या, घरफोड्या केल्याचे उघड झाले आहे. इंदिरा मातानगरात राहणार्‍या प्रशांत पारधीचा चोरट्यांच्या आंतरराज्यीय टोळीशी संबंध आहे. चोरीच्या वाहनांचा वापर करून ठिकठिकाणी चोर्‍या, घरफोड्या आणि दरोडे घालायचे, अशी त्याची कार्यपद्धत आहे. गुन्हे शाखेच्या पथकाला ७ मे रोजी तो गुप्तीसह सापडला.

त्याची कसून चौकशी केली असता तो चोरट्यांच्या आंतरराज्यीय टोळीशी संबंधित असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी त्याच्याकडून चोरीच्या दोन मोटरसायकली, गुप्ती आणि एक माऊझर (पिस्तूल) जप्त केले. त्याने आपल्या साथीदारांच्या मदतीने भंडारा जिल्ह्यातील अरोली, आंधळगाव येथे जबरी चोर्‍या तसेच नयनपूर (जि. मंडला, मध्य प्रदेश) येथे दरोडा घातल्याची कबुली दिली. गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक माधव गिरी, सहायक निरीक्षक विनोद चौधरी, हवालदार लक्ष्मण शेंडे, प्रमोद धोटे, अफसर पठाण, महेश बावणे, दिलीप आणि कयूम आदींनी ही कामगिरी बजावली. बालाघाटात वाहने विकली भंडारा, नागपुरातून मोटरसायकली चोरायच्या. त्या बालाघाट, मध्य प्रदेशात नेऊन तेथील साथीदारांच्या मदतीने विकायच्या, अशी प्रशांत आणि त्याच्या साथीदारांची कार्यपद्धत आहे. त्यांनी अशाप्रकारे अनेक चोरीच्या वाहनांची विल्हेवाट लावली.

Web Title: Pistol seized from student

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.