नागपुरात पिस्तूलधारी आरोपी गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2019 12:03 AM2019-03-21T00:03:56+5:302019-03-21T00:04:48+5:30

पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या एका आरोपीला परिमंडळ पाचच्या विशेष पथकाने बुधवारी अटक केली. दीपक यज्ञनारायण गुप्ता (वय २७, रा. घरसंसार सोसायटी, पगारीनगर) असे आरोपीचे नाव आहे.

Pistol possessor criminal accused arrested in Nagpur | नागपुरात पिस्तूलधारी आरोपी गजाआड

नागपुरात पिस्तूलधारी आरोपी गजाआड

Next
ठळक मुद्देकळमन्यात केली अटक : परिमंडळ पाचच्या पथकाची कामगिरी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या एका आरोपीला परिमंडळ पाचच्या विशेष पथकाने बुधवारी अटक केली. दीपक यज्ञनारायण गुप्ता (वय २७, रा. घरसंसार सोसायटी, पगारीनगर) असे आरोपीचे नाव आहे.
परिमंडळ ५ चे विशेष पथक कळमना मार्केट परिसरात बुधवारी गस्त करीत असताना घरसंसार सोसायटी परिसरात गुलाबी रंगाची पठाणी घालून असलेला तरुण पिस्तूल घेऊन फिरत आहे, अशी माहिती या पथकाला मिळाली. त्यावरून या पथकाने घटनास्थळी पोहचून दीपकला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ पिस्तूल मिळून आले. त्याला ताब्यात घेऊन कळमना पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवून दीपकला अटक करण्यात आली. परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त हर्ष पोद्दार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विनोद धोंगडे, माधव शिंदे, शिपाई राजकुमार जनबंधू, पंकज लांडे, सूरज भारती, दिनेश यादव, प्रभाकर मानकर, विनोद सोनटक्के, रवींद्र राऊत, मृदुल नगरे, अशोक दुबे आदींनी ही कामगिरी बजावली.

Web Title: Pistol possessor criminal accused arrested in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.