सुपाेषण संगिनी कुटुंबाच्या आधारस्तंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:12 IST2021-03-13T04:12:38+5:302021-03-13T04:12:38+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क सावनेर : स्त्री ही कुटुंबाची जननी आहे. स्त्रियांमधील सुप्तगुणांना वाव देण्यासाठी विविध मार्गाचा अवलंब करावा. स्त्री ...

सुपाेषण संगिनी कुटुंबाच्या आधारस्तंभ
लाेकमत न्यूज नेटवर्क
सावनेर : स्त्री ही कुटुंबाची जननी आहे. स्त्रियांमधील सुप्तगुणांना वाव देण्यासाठी विविध मार्गाचा अवलंब करावा. स्त्री सुदृढ असल्यास कुटुंब सुदृढ राहते. सुपाेषण संगिनी ही कुटुंबाचा आधारस्तंभ बनते, असे प्रतिपादन सावनेर पंचायत समितीचे खंडविकास अधिकारी अनिल नागणे यांनी जागतिक महिला दिनी सावनेर येथे आयाेजित कार्यक्रमात केले.
प्रमुख अतिथी म्हणून अदानी विल्मारचे सहायक महाप्रबंधक प्रदीपकुमार अग्रवाल, अदानी फाऊंडेशनच्या प्रकल्प अधिकारी जय़श्री काळे उपस्थित हाेते. अदानी फाऊंडेशनच्या सुपाेषण परियोजनेच्या माध्यमातून गावांमधील बालके, किशोरवयीन मुली तसेच गर्भवती महिला व स्तनदा मातांच्या आरोग्यासाठी व कुपोषण निर्मूलनासाठी विविध उपक्रम राबविले जातात. महिला व किशोरवयीन मुलींसाठी शरीरातील हिमोग्लोबिन वाढविण्यासाठी जनजागृती केली जाते. त्यासाठी चांगल्या पद्धतीने सुपोषण वाटिका तयार केल्या आहेत. परसबाग ही एक उत्कृष्ट संकल्पना आहे. प्रत्येक स्त्रीने आपल्या घरी परसबागेची निर्मिती करावी. अदानी फाऊंडेशनचा हा उपक्रम फक्त ६० गावांपुरता मर्यादित न ठेवता संपूर्ण तालुक्यात याची अंमलबजावणी करावी. त्यामुळे संपूर्ण तालुका सुपोषित होईल, असेही अनिल नागणे यांनी सांगितले.
स्त्री ही पुरुषांपेक्षा कुठेही कमी नाही. कोरोना काळात त्या एक लढवय्या म्हणून कार्यरत होत्या. ही गौरवाची बाब आहे, असे प्रतिपादन अदानी विल्मारचे सहायक महाप्रबंधक प्रदीपकुमार अग्रवाल यांनी केले. सुपोषण संगिनी या सुपोषण परियोजनाचा आधारस्तंभ असून, त्यांची भूमिका कुपोषण निर्मूलनासाठी प्रशंसनीय असल्याचे अदानी फाऊंडेशनच्या जयश्री काळे यांनी सांगितले. याप्रसंगी सुपोषण संगिनींसाठी पोस्टर आणि रांगोळी स्पर्धेचे आयोजन केले हाेते. सशक्त नारी, सशक्त कुटुंब, सशक्त समाज हा नाराही यावेळी देण्यात आला. संचालन पल्लवी गिरडकर यांनी केले. एकता ताकसांडे यांनी आभार मानले.