शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
3
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
4
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
5
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
6
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
7
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
8
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
9
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
10
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
11
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
12
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
13
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
14
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
15
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
16
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
17
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
18
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
19
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
20
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती

अंबाझरी मार्गावर पिलरच्या सळाखी कोसळल्या, जीवहानी टळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 23:03 IST

गुरुवारी पुन्हा एकदा मेट्रो रेल्वेच्या बांधकामादरम्यान निर्माणाधीन पिलरच्या वजनी सळाखीचा ढाचा अचानक रस्त्यालगतच्या बॅरिकेट्सवर कोसळला. त्या वेळी मार्गावरून जाणारी वाहने जागीच थांबल्यामुळे जीवहानी टळली. यामुळे मेट्रो रेल्वेतर्फे करण्यात येणारा सुरक्षेचा दावा फोल ठरला आहे. ही घटना एलएडी कॉलेज चौक ते अंबाझरी मार्गावर घडली.

ठळक मुद्दे मेट्रो रेल्वेचा सुरक्षेचा दावा फोल : कंत्राटदार कंपनीवर दंड

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गुरुवारी पुन्हा एकदा मेट्रो रेल्वेच्या बांधकामादरम्यान निर्माणाधीन पिलरच्या वजनी सळाखीचा ढाचा अचानक रस्त्यालगतच्या बॅरिकेट्सवर कोसळला. त्या वेळी मार्गावरून जाणारी वाहने जागीच थांबल्यामुळे जीवहानी टळली. यामुळे मेट्रो रेल्वेतर्फे करण्यात येणारा सुरक्षेचा दावा फोल ठरला आहे. ही घटना एलएडी कॉलेज चौक ते अंबाझरी मार्गावर घडली.प्राप्त माहितीनुसार, दुपारी १२ च्या सुमारात पिलरला लोखंडी कठडे (शटरिंग) बांधण्याचे काम सुरू होते. त्या वेळी एका कामगाराने दोर ओढल्यामुळे एका बाजूचा लोखंडी पाट्यांचा सपोर्ट सुटला. त्यामुळे पिलरसाठी बांधलेला लोखंडी ढाचा कोसळला. सुरक्षेसाठी बांधण्यात आलेल्या कठड्यावर कोसळल्यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनचालकांना थांबविण्यात आले. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक अनेक तास बंद होती. या वेळी उपस्थित अधिकारी, कर्मचारी, ट्राफिक मार्शल, वॉर्डन व क्यूआरटी चमूच्या सहायाने या मार्गावरील वाहतूक वळविली. क्रेनच्या साहाय्याने या सळाखींना नंतर कापून दुपारी २ वाजता रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करण्यात आला.दरम्यान झालेल्या घटनेची गंभीर दखल घेत महामेट्रो प्रशासनाने कारवाई केली असून तेथील कंत्राटदार राजेश्वर शर्मा आणि अभियंता देशराज या दोघांनाही कार्यमुक्त केले आहे. याशिवाय एफकॉन्स कंपनीवर एक लाखाचा दंड ठोठावला आहे.

कामादरम्यान निरंतर होताहेत अपघातमेट्रो रेल्वे प्रकल्पाचे काम ज्या वेगाने होत आहेत, त्याच प्रमाणात अपघातही वाढले आहेत. शनिवारी वर्धा रोडवर जयप्रकाशनगर मेट्रो स्टेशनच्या बांधकामादरम्यान महाकाय ८० फूट उंच टॉवर क्रेन अचानक रस्त्यावर कोसळली होती. त्या वेळी पाऊस असल्यामुळे रस्त्यावरून लोकांची ये-जा बंद होती. त्यामुळे जीवहानी टळली. या प्रकारे मुंजे चौकातही मेट्रो स्टेशनच्या बांधकामदरम्यान एका पिलरचा वजनी लोखंडी ढाचा रस्त्यावर कोसळला होता. त्या वेळीसुद्धा जीवहानी झाली नाही. तसेच सेंट्रल एव्हेन्यू मार्गावर बांधकामदरम्यान एक वजनी मशीन बॅरिकेट्सवर पडली होती. यामुळे एक वाहनचालक दाम्पत्य गंभीररीत्या जखमी झाले होते. 

टॅग्स :Metroमेट्रोAccidentअपघात