शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
2
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
3
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
4
BCCI च्या मुंबईतील कार्यालयात चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या मालालवर मारला डल्ला
5
"कलंकित मंत्र्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारने गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करून घ्यावे", विजय वडेट्टीवार यांची टीका
6
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
7
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
8
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
9
Asia Cup 2025 : रिषभ पंतच्या जागी अकोल्याच्या पठ्ठ्याची होऊ शकते टीम इंडियात एन्ट्री
10
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
11
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
12
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
13
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
14
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
15
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
16
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
17
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
18
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
19
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
20
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू

तीर्थदर्शन योजनेतील भाविकाचा बिहारमध्ये भीषण अपघात; पत्नी बचावली, पती कोमात, पाटणाच्या एम्समध्ये उपचार सुरू

By नरेश डोंगरे | Updated: February 9, 2025 20:22 IST

मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत ५ फेब्रुवारीला २३७ भाविक स्पेशल ट्रेनने नागपूर रेल्वे स्थानकावरून बुद्ध गयेकडे निघाले होते.

नागपूर : मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत बिहारच्या बुद्धगया येथे दर्शनाला गेलेल्या भाविकांपैकी विदर्भातील सहा जणांचा अपघात झाला. त्यात नागपुरातील अशोक ढाबरे यांना गंभीर दुखापत झाल्याने ते कोमात गेले असून, त्यांच्यावर पाटणा (बिहार) मध्ये उपचार सुरू आहेत. त्यांची पत्नी माया ढाबरे आणि अन्य चार जण मात्र या अपघातात थोडक्यात बचावले आहे.

मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत ५ फेब्रुवारीला २३७ भाविक स्पेशल ट्रेनने नागपूर रेल्वे स्थानकावरून बुद्ध गयेकडे निघाले होते. ७ फेब्रुवारीला सकाळी गयेपासून काही अंतरावर पोहोचल्यानंतर ही मंडळी फ्रेश झाली आणि आपापल्या सुविधेनुसार दर्शनस्थळाकडे निघाली. येथील महापुष्प सोसायटीत राहणारे अशोक ढाबरे, त्यांची पत्नी माया आणि अन्य चार असे सहा जण ऑटोत बसून दुपारी ३ च्या सुमारास बुद्धगयेकडे जात असताना चालकाच्या हलगर्जीपणामुळे भरधाव ऑटो उलटून खड्ड्यात पडला. परिणामी सहाही प्रवासी जखमी झाले. ढाबरे यांच्या डोक्याला जबर दुखापत झाल्यामुळे त्यांना तेथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना डॉक्टरांनी एम्समध्ये हलविले. तेथे त्यांना दाखल करून घेण्यास डॉक्टरांनी नकार दिला. तब्बल सात तास ते तसेच पडून राहिले. ही माहिती कळताच समाजकल्याण विभागाच्या सहायक आयुक्त सुकेशिनी तेलगोटे, नागपुरातील भाजपा नगरसेवक संदीप गवई यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयीन सहकाऱ्यांच्या माध्यमातून पाटणा एम्सच्या वरिष्ठांशी संपर्क केला. त्यानंतर मध्यरात्री ढाबरे यांना उपचारासाठी दाखल करून घेण्यात आले. मात्र, तोपर्यंत ढाबरे कोमात गेले होते.--------------

एअर ॲम्बुलन्ससाठी कुटुंबीयांचा टाहोया अपघाताची माहिती मिळताच ढाबरे यांची दोन्ही मुले आपल्या मित्रांसह पाटणा येथे पोहोचली. घरापासून शेकडो किलोमीटर दूर, वेगळा प्रांत, अनोळखी लोक, अशांमध्ये ढाबरे कुटुंबीयांची फरफट सुरू आहे. प्रकृती चिंताजनक असूनही येथे पाहिजे तसे उपचार मिळत नसल्याची तक्रारवजा माहिती ढाबरे कुटुंंबीयांनी पाटणा येथून लोकमतशी बोलताना दिली. अशोक ढाबरे यांना एअर ॲम्बुल्सनने नागपुरातील एम्समध्ये हलवावे, अशी आर्त मागणीही त्यांनी केली आहे.

----------------संबंधित वर्तुळात खळबळ

या अपघाताने संबंधित वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. या संबंधाने समाज कल्याणच्या सहायक आयुक्त तेलगोटे यांच्याशी संपर्क केला असता, त्यांनी पीडित कुटुंबीयांना मदत करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्याचे सांगितले. तेथे त्यांना उपचारासाठी किंवा राहण्या-खाण्यासाठी खर्च येणार नाही, याची तजवीज करण्यात आली. त्यांच्या मदतीसाठी विभागातील दोन व्यक्तींना रवाना करण्यात आल्याचेही सांगितले. ढाबरे यांना एअर ॲम्बुलन्सने हलविण्याबाबत विचारले असता, समाजकल्याणमंत्री आणि मुख्यमंत्री कार्यालयाच्या संबंधित वरिष्ठांच्या आपण संपर्कात असल्याचेही तेलगोटे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. 

टॅग्स :Accidentअपघातhospitalहॉस्पिटल