शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

‘सुपर एल-निनाे’ प्रभावाचे चित्र स्पष्ट नाही, हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांचे मत

By निशांत वानखेडे | Updated: October 18, 2023 20:05 IST

चक्रीवादळे राज्यात पावसासाठी अनुकूल नाहीत

नागपूर : सध्या सक्रिय असलेला ‘एल-निनाे’ अधिक तीव्र हाेत त्याचे ‘सुपर एल-निनाे’ मध्ये रुपांतर हाेईल आणि भारताच्या मान्सूनवर नकारात्मक परिणाम हाेईल, अशी शक्यता अमेरिकन संस्था ‘नाेआ’ने वर्तविली आहे. मात्र सध्यातरी सुपर एल-निनाेच्या प्रभावाबाबतचे चित्र स्पष्ट नाही, अशी माहिती हवामान विभागाचे माजी अधिकारी माणिकराव खुळे यांनी दिली.

नाेआच्या अंदाजानुसार सुपर एल-निनाेच्या प्रभावाने हिवाळ्यातही उष्णता जाणवणार असून उन्हाळा अत्याधिक तापदायक राहण्याची शक्यता आहे. शिवाय त्याचा मान्सूनवरही परिणाम हाेण्याची शक्यता संस्थेने व्यक्त केली आहे. त्यामुळे भारतात दुष्काळाची स्थिती येण्याची भीती त्यात आहे. मात्र माणिकराव खुळे यांच्या मते ती स्थिती अद्यापतरी स्पष्ट नाही. नाेआने याचवर्षी फेब्रुवारीमध्ये एल-निनाे जूनपासून कार्यरत हाेण्याची व पाऊस कमी पडण्याची शक्यता वर्तविली हाेती. जुलैमध्ये जाेरदार पाऊस झाला. ऑगस्टच्या काेरड्या स्थितीमुळे एल-निनाेचा प्रभाव वाढल्याचे जाणवले पण सप्टेंबरमध्ये अखेर पावसाची सरासरी भरून निघाली. त्यामुळे सुपर एल-निनाेच्या प्रभावासाठी आणखी काही काळ वाट पहावी लागेल, असे स्पष्ट मत खुळे यांनी व्यक्त केले.

पावसासाठी अनुकूल नाही स्थितीदरम्यान सध्या अरबी समुद्रात केरळ राज्यातील लक्षद्विप बेटाच्या पश्चिमेकडे कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून एका आठवड्यात २६ ऑक्टाेबरनंतर पुढच्या टप्प्यात विकसित हाेवून ओमानच्या दिशेने निघून जाईल. श्रीलंकेच्या कोलोम्बो शहराच्या अक्षवृत्तावर पश्चिमेकडे दक्षिण ब्रम्हदेशाच्या पश्चिम किनारपट्टीवर तयार झालेल्या चक्रीय वाऱ्याच्या स्थितीचे रूपांतर २१ ऑक्टोबरला कमी दाब क्षेत्रात हाेईल व नंतर पुढील टप्प्यात दक्षिण बांगलादेशाकडे दिशेने निघून जाण्याची शक्यता आहे. मात्र काेणतीही स्थिती महाराष्ट्रावर पावसासाठी अनुकूल नसल्याचा अंदाज खुळे यांनी व्यक्त केला आहे.

आठवडाभर ऑक्टाेबर हिटसध्या विदर्भासह महाराष्ट्राला ऑक्टाेबर हिटचे चटके सहन करावे लागत आहे. तज्ज्ञांच्या मते आठवडाभर म्हणजे २५ ऑक्टाेबरपर्यंत ही स्थिती राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर बदलत्या वातावरणाची स्थिती स्पष्ट हाेईल, अशी माहिती त्यांनी दिली.

टॅग्स :nagpurनागपूरRainपाऊसMaharashtraमहाराष्ट्र