शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
2
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
3
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
4
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
5
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
6
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
7
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
8
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
9
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
10
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
11
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
12
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
13
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
14
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
15
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
16
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
17
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
18
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
19
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
20
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका

फुले-आंबेडकर यांची ‘राष्ट्र संकल्पना’ समताधिष्ठित : सुखदेव थोरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2019 22:25 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राष्ट्र म्हणजे काय आणि राष्ट्रीयता म्हणजे काय, यावर आपले विचार मांडले आहे. त्यांच्यानुसार जेव्हा समाजामध्ये समानता, एकत्र असण्याची भावना, समान विचार, समान चेतना, लोकांमध्ये एकमेकांबद्दल सहवेदना असेल, तरच राष्ट्र अधिक समर्थ बनेल. ही बाबासाहेबांची समताधिष्ठीत राष्ट्र संकल्पना होती, असे प्रतिपादन अनुदान आयोग विद्यापीठाचे माजी अध्यक्ष डॉ. सुखदेव थोरात यांनी येथे केले.

ठळक मुद्देडॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त नागरी जयंती सोहळ्याला सुरुवात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राष्ट्र म्हणजे काय आणि राष्ट्रीयता म्हणजे काय, यावर आपले विचार मांडले आहे. त्यांच्यानुसार जेव्हा समाजामध्ये समानता, एकत्र असण्याची भावना, समान विचार, समान चेतना, लोकांमध्ये एकमेकांबद्दल सहवेदना असेल, तरच राष्ट्र अधिक समर्थ बनेल. ही बाबासाहेबांची समताधिष्ठीत राष्ट्र संकल्पना होती, असे प्रतिपादन अनुदान आयोग विद्यापीठाचे माजी अध्यक्ष डॉ. सुखदेव थोरात यांनी येथे केले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त नागरी जयंती समिती, नागपूरच्यावतीने दीक्षाभूमी येथे शनिवारपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त नागरी जयंती सोहळ्याला सुरुवात झाली. यावेळी फुले-आंबेडकर यांची ‘ राष्ट्र संकल्पना’ या विषयावर आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते. मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर दीक्षाभूमी स्मारक समितीचे सदस्य विलास गजघाटे, प्रा. डॉ. सागर जाधव, प्रा. रमेश पिसे, जैबुप्रिसा शेख व सरोज आगलावे उपस्थित होत्या.डॉ. थोरात म्हणाले, एक भूभाग, एक वंश, एक भाषा, एक संस्कृती ही राष्ट्र बनविण्याकरिता आवश्यक आहेच, परंतु सोबतच राष्ट्रीयत्वाची भावना त्याहूनही आवश्यक आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेले समताधिष्ठीत राष्ट्र घडविण्यासाठी प्रयत्न सुरू असलेतरी ते अपुरे पडत आहे. यात प्रत्येकाच्या सहभागाची गरज आहे. मात्र, गेल्या पाच वर्षांत जातीजातीमधील तेढ वाढली आहे. व्यक्ती स्वातंत्र्यावर बाधा आली आहे. विशिष्ट धर्माची वैदिक विचारसरणी लादण्याचा प्रयत्न होत आहे. ही समताधिष्ठित राष्ट्राला मारक ठरणारी आहे, असेही ते म्हणाले.प्रा. डॉ. सागर जाधव म्हणाले, शुद्रातील शुद्र माणसाचा विकास होत नाही तोपर्यंत या देशाला ‘नेशन’ असे म्हणता येणार नाही. महात्मा ज्योतिबा फुले यांनी ही संकल्पना मांडून थांबले नाहीत तर, त्यांनी आपल्या हयातीमध्ये ग्रंथांच्या माध्यमातून, स्त्रियांच्या, अस्पृश्य उद्धारातून, शिक्षणाच्या चळवळीतून यावर काम केले आहे. राष्ट्रामध्ये सर्व जातीधर्माचे लोक एकत्र कसे राहतील अशी भूमिका महात्मा फुले यांनी मांडली आहे. तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यानुसार, जोपर्यंत जाती, वेद, पंथ अस्तित्वात राहतील, तोपर्यंत बंधुत्वाची भावना विकसित होणार नाही. यामुळे राष्ट्राचा विकासही होणार नाही, असेही ते म्हणाले. याप्रसंगी प्रा. रमेश पिसे व जैबुप्रिसा शेख यांनीही आपले विचार मांडले. प्रास्ताविक सरोज आगलावे यांनी केले. संचालन डॉ. सरोज डांगे यांनी केले.

टॅग्स :Dr Babasaheb Ambedkar Jayantiडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीDiksha Bhoomi Nagpurदीक्षाभूमी