शेतकऱ्यांच्या प्रश्नावर पर्णचित्र!
By Admin | Updated: September 5, 2014 01:08 IST2014-09-05T01:08:15+5:302014-09-05T01:08:15+5:30
प्रख्यात पर्णचित्रकार सुभाष तुलसीता येत्या ६ सप्टेंबर रोजी चिटणवीस सेंटरच्या लॉनवर सुकलेल्या पानांपासून जगातील सर्वांत मोठे पर्णचित्र साकारणार आहेत.

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर पर्णचित्र!
जगातील सर्वांत मोठे पर्णचित्र : चित्रकार तुलसीता साकारणार
नागपूर : प्रख्यात पर्णचित्रकार सुभाष तुलसीता येत्या ६ सप्टेंबर रोजी चिटणवीस सेंटरच्या लॉनवर सुकलेल्या पानांपासून जगातील सर्वांत मोठे पर्णचित्र साकारणार आहेत.
विशेष म्हणजे, ‘विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या’ या विषयावर ते आधारित राहणार आहे. नागपुरातील कलावंत श्वेता भट्टड यांनी जगभरात ‘आय हॅव ‘अ’ ड्रीम’ ही कला व शेती योजना सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या योजनेत संपूर्ण जगात शेतकऱ्यांशी निगडित विषयांवर आधारित कलेचे निर्माण केले जात आहे. यात आतापर्यंत जगातील सुमारे २६ देश जोडण्यात आले आहेत. नागपुरातील पर्णचित्रकार तुलसीतासुद्धा गत अनेक वर्षांपासून आपल्या कलेच्या माध्यमातून याच विषयांवर काम करीत आहे.
त्यानुसार ६ सप्टेंबर रोजी चिटणवीस सेंटर येथील ५,६०० चौ. फूट मैदानावर भव्य पर्णचित्र तयार करणार आहेत. त्यासाठी नागरिकांनी वाळलेल्या पानांसह पोहोचून पर्णचित्र पूर्ण करण्यास मदत करावी, असे तुलसीता यांनी आवाहन केले आहे. (प्रतिनिधी)