मतदार यादीत छायाचित्र बंधनकारक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 04:20 IST2021-02-20T04:20:27+5:302021-02-20T04:20:27+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क नरखेड : मतदान प्रक्रिया व्यवस्थित व पारदर्शक राबविण्याच्या उद्देशाने मतदार यादीत यापुढे छायाचित्र बंधनकारक करण्यात आले ...

मतदार यादीत छायाचित्र बंधनकारक
लाेकमत न्यूज नेटवर्क
नरखेड : मतदान प्रक्रिया व्यवस्थित व पारदर्शक राबविण्याच्या उद्देशाने मतदार यादीत यापुढे छायाचित्र बंधनकारक करण्यात आले आहे. निवडणूक विभागाने जाहीर केलेल्या यादीत ज्या मतदाराच्या नावासमाेर छायाचित्र नाही, त्यांचे नाव वगळले जाणार आहे. यासाठी मतदारांनी वेळीच काळजी घेऊन तालुक्यातील बीएलओ किंवा तहसील कार्यालयातील निवडणूक विभागाकडे छायाचित्र जमा करावे, असे आवाहन तहसीलदार डी. जी. जाधव यांनी केले आहे.
मतदार यादीत नावे आहेत, परंतु नावासमाेर छायाचित्र नाही, असे तालुक्यात ३,०१५ मतदार आहेत. या मतदारांचे छायाचित्र गाेळा करण्यासाठी बीएलओ घराेघरी जाऊन सर्वेक्षण करीत आहेत. जे मतदार स्थानांतरित आहेत, अशा मतदारांसंदर्भात पंचनामे करण्यात येणार आहेत. पंचनामे केलेल्या मतदारांची नावे मतदार यादीतून कमी करण्याची कारवाई करण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. तहसील कार्यालयात मतदार यादीत आपले नाव, त्यासमाेर छायाचित्र आहे अथवा नाही, याबाबत चाैकशी करण्याकरिता नायब तहसीलदार (निवडणूक) विजय डांगोरे, नायब तहसीलदार भागवत पाटील, राजेश नितनवरे, गुणवंत ढोके, युवक चर्जन, सिध्दार्थ नारनवरे यांच्याशी संपर्क साधावा, असेही तहसीलदार जाधव यांनी कळविले आहे.