पंचशीलाची शिकवण ही जगाला अमूल्य भेट
By Admin | Updated: October 11, 2016 03:24 IST2016-10-11T03:24:42+5:302016-10-11T03:24:42+5:30
तथागत गौतम बुद्धांनी दिलेली पंचशीलाची शिकवण ही जगाला भारताने दिलेली अमूल्य भेट आहे. बुद्धगया,

पंचशीलाची शिकवण ही जगाला अमूल्य भेट
कामठी : तथागत गौतम बुद्धांनी दिलेली पंचशीलाची शिकवण ही जगाला भारताने दिलेली अमूल्य भेट आहे. बुद्धगया, सारनाथ, लुंबिनी आणि कुशीनगरनंतर नागपूरच्या दीक्षाभूमीचे जगात महत्त्वपूर्ण स्थान आहे, असे प्रतिपादन लद्दाख येथील भंते संघसेन यांनी केले.
कामठी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्राच्या प्रांगणात धम्मचक्र महोत्सवानिमित्त आयोजित आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म शांती परिषदेत प्रमुख अतिथी म्हणून भंते संघसेन बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, परिषदेच्या आयोजक माजी राज्यमंत्री अॅड. सुलेखा कुंभारे व अन्य मान्यवर उपस्थित होते.
परंपरागत बुद्धिस्ट आणि नवबौद्धिस्ट यांनी परस्परांना सहकार्य करून तथागत गौतम बुद्धांचा धम्म देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन उपस्थिताना केले. महान परंपरा लाभलेल्या बुद्ध धम्माचे तत्त्वज्ञान चिरकालीन असून देशातून लुप्त होत जाणाऱ्या बौद्ध धम्माच्या चळवळीला नवीन दिशा देण्याचे काम दीक्षाभूमी आणि आता ड्रॅगन पॅलेस टेम्पलच्या माध्यमातून होत आहे.