शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

पेट्रोलपंपावर दरोडा टाकणाऱ्या सहा दरोडेखोरांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 23:48 IST

 नागपूर जिल्ह्यातील  नरखेड येथील सावरगाव रोडवरील पेट्रोलपंपावर दरोडा टाकणाऱ्या सहा आरोपींना नरखेड पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून वाहनासह मोबाईल हॅन्डसेट असा ऐवज जप्त केला. या सहाही आरोपींना २१ जुलेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

ठळक मुद्देनागपूर जिल्ह्यातील  नरखेड येथील घटना : शनिवारपर्यंत पोलीस कोठडी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर  : नागपूर जिल्ह्यातील  नरखेड येथील सावरगाव रोडवरील पेट्रोलपंपावर दरोडा टाकणाऱ्या सहा आरोपींना नरखेड पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून वाहनासह मोबाईल हॅन्डसेट असा ऐवज जप्त केला. या सहाही आरोपींना २१ जुलेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.चंद्रकांत ऊर्फ शेखर मंगल लैसिह (२७, रा. परसोडी दीक्षित, ता. नरखेड), चंद्रशेखर ऊर्फ नीलेश प्रभाकर कोकाटे (२७, रा. परसोडी दीक्षित), अक्षय रमेश वरुडकर (२३, रा. वॉर्ड क्र.३, शनिवारपेठ, कोंढाळी), भूषण चिरकुठराव पेठे (२६, रा. वॉर्ड क्र. ७, कोंढाळी), जगदीश मारोतराव हजारे (२५, रा. अध्यापक ले-आऊट, नागपूर), स्वप्निल वामनराव ढोरे (२५, रा. जयताळा, नागपूर) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. पेट्रोलपंप दरोड्याची ही घटना शुक्रवारी (दि. १३) रात्री १०.३० वाजताच्या सुमारास घडली. फिर्यादी प्रकाश गोविंदा नारनवरे (२३, रा. वॉर्ड क्र. १३, इंदिरानगर, नरखेड) याने दिलेल्या तक्रारीनुसार, तो आणि त्याचे दोन सहकारी पेट्रोलपंपावर होते. दरम्यान दोन मोटसायकलवर आलेल्या सहा दरोडेखोरांनी चाकू आणि इतर शस्त्राचा धाक दाखवित १३ हजार २६० रुपये, मोबाईल हॅन्डसेट असा एकूण २२ हजार २५९ रुपयांचा ऐवज पळविला. तसेच दरोडेखोरांनी सीसीटीव्ही व डी.व्ही.आर. बॉक्सची तोडफोड केली. या तक्रारीवरून भादंविच्या कलम ३९५, ४२७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.या गुन्ह्याचा तपास करताना सीसीटीव्ही फुटेजची मदत घेण्यात आली. त्यातील एक आरोपी हा नीलेश कोकाटे असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार पोलीस मागावर होते. अशातच रविवारी (दि. १५) रात्री ८:४० वाजताच्या सुमारास चंद्रकांत लैसिह याला पोलिसांनी ताब्यात घेतले.त्याची चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. नीलेश कोकाटे याला सोमवारी (दि. १६) सकाळी ८ वाजताच्या सुमारास ताब्यात घेतले. त्यांना न्यायालयात हजर केले असता २१ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान उर्वरित चार आरोपी हे एमएच-३१/सीएन-१८०८ क्रमांकाच्या इनोव्हा वाहनातून नागपुरातून पसार होण्यापूर्वीच पोलिसांनी त्यांना मंगळवारी (दि. १७) अटक केली. त्यांनाही २१ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.अतुलनीय कामगिरीही कारवाई पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अप्पर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक दिलीप मसराम, पोलीस हवालदार धनराज भुक्ते, लखन महाजन, राजिक शेख, पुरुषोत्तम काकडे, नीतेश पुसाम, अनिस शेख, पृथ्वीराज चव्हाण, मनीष सोनोने, कैलास टेकाडे, मिलिंद राठोड, दिगांबर राठोड, संतोष क्षीरसागर, सायबर सेलेचे चेतन राऊत, तुलाराम चटप यांनी पार पाडली.

टॅग्स :Crimeगुन्हाRobberyदरोडा