वर्षभरात पेट्रोल ९.५३ तर डिझेलची ९.१८ रुपये वाढ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:10 IST2021-01-03T04:10:25+5:302021-01-03T04:10:25+5:30

मोरेश्वर मानापुरे नागपूर : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत होणाऱ्या चढउतारानुसार देशांतर्गत स्थानिक बाजारपेठेत गेल्या वर्षात पेट्रोल आणि डिझेलच्या ...

Petrol price hiked by Rs 9.53 and diesel by Rs 9.18 during the year! | वर्षभरात पेट्रोल ९.५३ तर डिझेलची ९.१८ रुपये वाढ!

वर्षभरात पेट्रोल ९.५३ तर डिझेलची ९.१८ रुपये वाढ!

मोरेश्वर मानापुरे

नागपूर : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत होणाऱ्या चढउतारानुसार देशांतर्गत स्थानिक बाजारपेठेत गेल्या वर्षात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ झाली आहे. १ जानेवारी २०२० ते १ जानेवारी २०२१ या एक वर्षाच्या काळात पेट्रोल प्रति लिटर ९.५३ रुपये आणि डिझेलची ९.१८ रुपये वाढ होऊन अनुक्रमे पेट्रोल ९०.८० रुपये आणि डिझेल ८१.०२ रुपयावर पोहोचले. त्यामुळे या दरवाढीचा फटका ग्राहकांना बसला आहे.

२५ मार्चपासून संपूर्ण देशात लॉकडाऊन झाल्यानंतर दुचाकी आणि चारचाकी वाहने रस्त्यावर आवश्यक कामासाठीच दिसली. त्यामुळे या काळात पेट्रोल आणि डिझेलच्या विक्रीत ८० टक्के घसरण झाली होती. याशिवाय मार्चच्या अखेरपासून ८ जूनपर्यंत किमती स्थिर अर्थात पेट्रोल ७६.३२ तर डिझेल ६६.३७ रुपये होते. त्यानंतर ९ जूनपासून राज्य शासनाने २ रुपये इंधन अधिभार लावला. अधिभार आणि करासह पेट्रोल ७९.३९ आणि डिझेल ६९.३२ रुपयावर गेले. जून महिन्यात इंधनाच्या किमती दरदिवशी वाढतच होत्या. २५ जूनला पेट्रोल प्रति लिटर ८७.३८ रुपये आणि डिझेल ७९.०४ रुपयावर पोहोचले.

गेल्या वर्षी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत १ जानेवारी २०२० ते ११ मार्च या काळात ४.९५ रुपये तर डिझेलमध्ये ५.४७ रुपयाची घसरण पाहायला मिळाली. या किमती एप्रिल आणि मे महिन्यात स्थिर होत्या. जून महिन्यात १ जूनला राज्य शासनाने २ रुपये अधिभार आकारण्याची घोषणा केली आणि त्याची अंमलबजावणी ९ जूनपासून केली. त्यानंतर दोन्ही इंधनाचे दर वाढण्यास सुरुवात झाली. एकूणच जूनमध्ये १६ दिवसात पेट्रोल ७.९९ रुपये आणि डिझेलची ९.७२ रुपयाने वाढ झाली. सध्या २५ डिसेंबरपासून पेट्रोल ९०.८० रुपये आणि डिझेल ८१.०२ रुपयावर स्थिर आहे. हिंदुस्थान पेट्रोलियमच्या पंपापेक्षा इंडियन ऑईलच्या पंपावर ११ पैसे पेट्रोल महाग मिळते.

असे आहेत पेट्रोल व डिझेलचे बदलते दर :

तारीख-वर्षपेट्रोलडिझेल (रु. प्रति लिटर)

१ जाने. २०२० ८१.२७ ७१.८४

१ फेब्रु. २०२० ७९.२१ ६९.८७

१ मार्च २०२० ७७.८७ ६७.८७

एप्रिल व मे महिन्यात पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर

१ जून २०२० ७६.३२ ६६.३७

९ जून २०२० ७९.३९ ६९.३२

२५ जून २०२० ८७.३८ ७९.०४

१ जुलै २०२० ८७.६७ ८०.१६

१ ऑगस्ट २०२० ८७.८३ ८०.७१

१ सप्टें. २०२० ८९.२८ ८०.४१

१ ऑक्टो. २०२० ८८.२९ ७७.४४

१ नोव्हें. २०२० ८८.२९ ७७.४४

१ डिसें. २०२० ८९.७८ ७९.९२

१ जाने. २०२१ ९०.८० ८१.०२

Web Title: Petrol price hiked by Rs 9.53 and diesel by Rs 9.18 during the year!