शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
2
जे विष वापरून ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचला, तेच विष बनवणाऱ्या डॉक्टरवर ATS ला संशय कसा आला?
3
लेन्सकार्टच्या गुंतवणूकदारांना मोठा झटका! IPO ला बंपर प्रतिसाद, पण लिस्टिंगनंतर शेअर कोसळला
4
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
5
कारच्या 'हेजर्ड लाइट्स'चा वापर कधी करावा, कधी नाही? सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी नियम माहीत आहेत का?
6
११ जिल्हे, ५९ सर्च ऑपरेशन, १० जणांना अटक; ४८ तास सुरू असलेल्या छाप्याची इनसाईड स्टोरी
7
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
8
'पंचायत' फेम जितेंद्र कुमारच्या आगामी सिनेमाची घोषणा, 'ही' अभिनेत्री साकारणार आईची भूमिका
9
“कोरेगाव प्रकरणात जमीन परत केली तरी पार्थ पवारांवर कारवाई झालीच पाहिजे”; काँग्रेसची मागणी
10
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
11
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
12
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
13
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
14
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
15
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
16
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
17
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
18
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
19
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
20
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...

मलकापूर येथील थकीत कर वसुलीवरील याचिका फेटाळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2019 23:04 IST

गेल्या नऊ वर्षापासून प्रलंबित थकीत कर वसुलीसंदर्भातील जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी फेटाळून लावली. न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व विनय जोशी यांनी हा निर्णय दिला.

ठळक मुद्देहायकोर्टाचा निर्णय : नागरी समस्या मांडण्याची मुभा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गेल्या नऊ वर्षापासून प्रलंबित थकीत कर वसुलीसंदर्भातील जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी फेटाळून लावली. न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व विनय जोशी यांनी हा निर्णय दिला.बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूरमधील रहिवाशांकडे नगर परिषदेचा कोट्यवधी रुपयाचा कर थकीत आहे. तो कर तातडीने वसूल करण्यात यावा यासाठी अशोक खर्चे, डॉ. विजय डागा, सय्यद इब्राहिम व चंद्रभान निळे यांनी २०१० मध्ये ही याचिका दाखल केली होती. कर थकीत असल्यामुळे विकासकामांसाठी निधी अपुरा पडत असल्याचे त्यांचे म्हणणे होते. न्यायालयाने ही याचिका आणखी प्रलंबित ठेवण्यास नकार दिला व नागरी सुविधांबाबत काही तक्रारी असल्यास त्यावर नवीन याचिका दाखल करण्याची याचिकाकर्त्यांना मुभा देऊन ही याचिका फेटाळून लावली.न्यायालयाच्या आदेशामुळे नगर परिषदेने थकीत कराची काही रक्कम वसूल केली, पण अद्याप मोठी रक्कम थकीत आहे. ८ ऑगस्ट २०१८ रोजी न्यायालयाने नगर परिषदेची उदासीन भूमिका लक्षात घेता अधिकाऱ्यांवर ताशेरे ओढले होते. तसेच, कर वसुलीसाठी वीज व पाणीपुरवठा खंडित करण्यासारखी कठोर कारवाई करण्याचा आदेश दिला होता. परंतु, परिस्थितीत फारसा बदल घडला नाही. गेल्या तारखेला न्यायालयास प्रकरणातील वकिलांकडून योग्य सहकार्य मिळाले नाही. त्यामुळे न्यायालयाने वकिलांवर प्रत्येकी १० हजार रुपये दावा खर्च बसविण्याची तंबी दिली होती.

 

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयTaxकरMalkapurमलकापूर