काँक्रिट रिंग रोड विरोधातील याचिका फेटाळली
By Admin | Updated: January 23, 2016 03:09 IST2016-01-23T03:09:06+5:302016-01-23T03:09:06+5:30
काटोल रोड व कामठी रोडला जोडणाऱ्या रिंग रोडच्या काँक्रिटीकरण विरोधातील जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी फेटाळून लावली....

काँक्रिट रिंग रोड विरोधातील याचिका फेटाळली
हायकोर्ट : काटोल रोड व कामठी रोडला जोडणारा रिंग रोड
नागपूर : काटोल रोड व कामठी रोडला जोडणाऱ्या रिंग रोडच्या काँक्रिटीकरण विरोधातील जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी फेटाळून लावली.न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व प्रदीप देशमुख यांनी हा निर्वाळा दिला. सामाजिक कार्यकर्ते मोहन कारेमोरे यांनी ही याचिका सादर केली होती. हा डांबरी रिंग रोड आहे. डांबरीकरण काढून काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. त्यावर २२० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. यामुळे शासनाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होणार आहे. परंतु, नवीन डांबरीकरण केल्यास २० कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च होणार नाही. रोडचे काँक्रिटीकरण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात रेती उत्खनन केले जाईल. त्यामुळे नदीतील पाण्याची पातळी खोल जाईल. नदीकाठावरील शेताला पाणी मिळणार नाही. यामुळे शेतकरी आत्महत्या करतील. तसेच, पर्यावरणाचेही नुकसान होईल असे याचिकाकर्त्याचे म्हणणे होते. हा रोड १९९५ मध्ये बांधण्यात आला होता. न्यायालयाने विविध बाबी लक्षात घेता ही याचिका जनहिताच्या विरोधात असल्याचे निरीक्षण नोंदवून ती फेटाळून लावली. याचिकाकर्त्यातर्फे अॅड. ए. पी. रघुते तर, शासनातर्फे अतिरिक्त सरकारी वकील दीपक ठाकरे यांनी बाजू मांडली.(प्रतिनिधी)