शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

पत्रिकेत नाव नसल्यामुळे खासदार तुमाने नाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2017 1:17 AM

कामठी येथे ड्रॅगन पॅलेस टेम्पल परिसरात उभारण्यात आलेल्या विपश्यना मेडिटेशन सेंटरचे शुक्रवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

ठळक मुद्देसंसदेत हक्कभंग दाखल करणार : कामठीत राष्ट्रपतींच्या कार्यक्रमाला अनुपस्थित

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कामठी येथे ड्रॅगन पॅलेस टेम्पल परिसरात उभारण्यात आलेल्या विपश्यना मेडिटेशन सेंटरचे शुक्रवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. आपल्या रामटेक लोकसभा मतदारसंघात सामाजिक न्याय विभागातर्फे आयोजित या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत नाव नसल्यामुळे शिवसेनेचे खासदार कृपाल तुमाने चांगलेच नाराज झाले. हा राजशिष्टाचाराचा भंग असून याप्रकरणी संसदेत हक्कभंग प्रस्ताव दाखल करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.ओगावा सोसायटीसोबतच राज्य सरकारच्या सामाजिक न्याय विभागातर्फे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदा मंत्री नितीन गडकरी, राज्याचे ऊर्जा व उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, माजी मंत्री अ‍ॅड. सुलेखा कुंभारे उपस्थित होत्या. या सर्व मान्यवरांची नावे निमंत्रण पत्रिकेतही होती. मात्र, खासदार कृपाल तुमाने यांचे नाव पत्रिकेत नव्हते. कृपाल तुमाने हे रामटेक लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत. या मतदारसंघात कामठीचा समावेश आहे. त्यामुळे राजशिष्टाचारानुसार खासदार म्हणून तुमाने यांचे नाव या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत असणे आवश्यक होते. मात्र, त्यांचे नाव निमंत्रण पत्रिकेत नमूद करण्यात आले नाही. यावर तुमाने यांनी नाराजी व्यक्त केली. तुमाने यांनी नागपूर विमानतळ तसेच रामटेक येथे आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहून राष्ट्रपतींचे स्वागत केले. मात्र, कामठीच्या या कार्यक्रमाला उपस्थित राहणे टाळले.साधे निमंत्रणही नाहीराष्ट्रपती व पंतप्रधान यांच्या कार्यक्रमात स्थानिक खासदारांचे नाव समाविष्ट करणे आवश्यक असते. त्यानुसार राज्य सरकारच्या सामाजिक न्याय विभागातर्फे कामठी येथे आयोजित कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत खासदार म्हणून आपले नाव असणे आवश्यक होते. पण तसे झाले नाही. आपल्याला साधे निमंत्रणही देण्यात आले नाही. या अवमानाबद्दल सामाजिक न्याय विभागाच्या विरोधात संसदेत हक्कभंग प्रस्ताव सादर केला जाईल. लोकप्रतिनिधींचा सन्मान राखायलाच हवा.- कृपाल तुमाने,खासदार, रामटेक लोकसभा मतदारसंघ