शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

बलात्कारामुळे धारण गर्भ पाडण्याची परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2018 20:02 IST

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी पीडित अल्पवयीन मुलीला बलात्कारामुळे धारण झालेला गर्भ पाडण्याची परवानगी दिली. न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व मुरलीधर गिरटकर यांनी हा निर्णय दिला.

ठळक मुद्देहायकोर्टाचा निर्णय : पीडित मुलीच्या जीवाला धोका नसल्याचा अहवाल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी पीडित अल्पवयीन मुलीला बलात्कारामुळे धारण झालेला गर्भ पाडण्याची परवानगी दिली. न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व मुरलीधर गिरटकर यांनी हा निर्णय दिला.गर्भपाताची शस्त्रक्रिया केल्यास पीडित मुलीच्या जीवाला धोका होणार नाही. परंतु, बाळ जन्माला आल्यास तिच्या मानसिक अवस्थेवर वाईट परिणाम पडू शकतो असा अहवाल वैद्यकीय मंडळाने न्यायालयात सादर केला. न्यायालयाने मंडळाचा अहवाल लक्षात घेऊन हा निर्णय दिला. तसेच, पीडित मुलीवर येत्या दोन दिवसांमध्ये आवश्यक शस्त्रक्रिया करण्यास सांगितले. न्यायालयाच्या आदेशावरून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) येथील तज्ज्ञांचे वैद्यकीय मंडळ स्थापन करण्यात आले होते. मंडळाने गेल्या शनिवारी मुलीच्या आवश्यक तपासण्या केल्या. त्या आधारावर प्रसूतीशास्त्र व स्त्रीरोगशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. जे. आय. फिदवी यांनी न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले. त्यासोबत मुलीचा वैद्यकीय तपासणी अहवाल जोडण्यात आला होता. मुलीच्या पोटात २० आठवडे पूर्ण झालेला गर्भ आहे. मुलगी केवळ १६ वर्षे १० महिने वयाची असून ती बोरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहते. तिने गर्भपाताची परवानगी मिळविण्यासाठी आईमार्फत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. तिची याचिका मंजूर करण्यात आली. मुलीतर्फे अ‍ॅड. चिन्मय धर्माधिकारी, राज्य सरकारतर्फे अ‍ॅड. केतकी जोशी तर, केंद्र सरकारतर्फे अ‍ॅड. मुग्धा चांदुरकर यांनी बाजू मांडली.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयRapeबलात्कार