बलात्कार पीडित मुलीला गर्भपाताची परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:07 IST2021-05-29T04:07:35+5:302021-05-29T04:07:35+5:30

नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी चंद्रपूर जिल्ह्यातील बलात्कार पीडित अल्पवयीन मुलीचा गर्भपात करण्याची परवानगी दिली. ...

Permission to abort rape girl | बलात्कार पीडित मुलीला गर्भपाताची परवानगी

बलात्कार पीडित मुलीला गर्भपाताची परवानगी

नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी चंद्रपूर जिल्ह्यातील बलात्कार पीडित अल्पवयीन मुलीचा गर्भपात करण्याची परवानगी दिली. यासाठी मुलीच्या आईने याचिका दाखल केली होती.

न्यायमूर्ती पुष्पा गणेडीवाला यांनी याचिकेवर निर्णय दिला. हा निर्णय देताना वैद्यकीय मंडळाचा अहवाल विचारात घेण्यात आला. बाळाचा नैसर्गिकरीत्या जन्म होऊ दिल्यास मुलीच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम होईल असे या अहवालात स्पष्ट करण्यात आले. परिणामी, मुलीला दिलासा देण्यात आला. पीडित मुलगी १५ वर्षे वयाची असून तिच्या गर्भात २२ आठवड्यांचे बाळ आहे. चंद्रपूर येथील शासकीय रुग्णालयात तिचा गर्भपात केला जाणार आहे. या मुलीवर बांधकाम मजूर सहीराम संजय गायकवाडने बलात्कार केल्याचा आरोप आहे. गायकवाडविरुध्द जीवती पोलिसांनी एफआयआर नोंदवला आहे. याचिकाकर्तीतर्फे अ‍ॅड. स्वीटी भाटिया यांनी कामकाज पाहिले.

Web Title: Permission to abort rape girl